छत्रपती शिवाजी महाराजांना साजेसे नवे शिल्प साकारा!
*🛑छत्रपती शिवाजी महाराजांना साजेसे नवे शिल्प साकारा!*
*🛑संभाजीराजे छत्रपती यांनी केली होती मागणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-२४:-* संभाजीराजे छत्रपती यांनी १२ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवून आपल्या राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल आपल्या भावाना व्यक्त केल्या होत्या. आज पुतळा कोसळल्यानंतर त्यांनी आपल्या वेदना व्यक्त करताना पुन्हा एकदा सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविलेले पत्र पोस्ट केले आहे. यात ते असे म्हणाले होते की, ४ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय नौदल दिनाचे औचित्य साधून आपण करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुकच आहे. वस्तुतः महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळपास शंभर वर्षापूर्वी देखील तयार केलेल्या अनेक पूर्णाकृती भव्य मूर्ती पाहावयास मिळतात. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या अनेक नामांकित शिल्पकारांनी आधुनिक साधनांची
कमतरता असतानाही ही शिल्पे साकारली आहेत. मात्र, राजकोट येथे आपण अनावरण केलेले शिल्प हे उत्तम शिल्पकलेच्या मानदंडात बसत नसल्याचे दिसून येत आहे. कित्येक आधुनिक साधने उपलब्ध असतानाही या शिल्पाची जडणघडण प्रभावी व रेखीव दिसत नाही. मूर्तीच्या अनेक भागात कमतरता दिसून येतात. मूर्तीचे हात, पाय व चेहरा यांमध्ये प्रमाणबद्धता दिसत नाही. हेच शिल्प कायमस्वरुपी आहे की केवळ आपल्या हस्ते अनावरण कार्यक्रम पार पाडण्यासाठी बसविलेले तात्पुरते शिल्प आहे व नंतर याठिकाणी चांगले शिल्प बसवले जाणार आहे, याचा उलगडा होत नाही. तरी शासनाच्या एखाद्या तज्ज्ञ समितीने परिपूर्ण परीक्षण करुन उत्तम शिल्पकलेचा नमुना म्हणून गणले जाईल, असे छत्रपती शिवाजी महाराजांना साजेसे नवे शिल्प या ठिकाणी लवकर प्रतिस्थापित करावे ही विनंती, असे म्हटले होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
