डिगस तळेवाडी लघुपाटबंधारे तलावाच्या कालवा पुनर्स्थापना कामाचा शुभारंभ..
▪️आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कुडाळ,दि.१३: तालुक्यातील जलसंपदा विभाग, रत्नागिरी पाटबंधारे मंडळाच्या लघुपाटबंधारे योजनेंतर्गत डिगस तळेवाडी ल.पा. तलावाच्या कालवा पुनर्स्थापना (बंदिस्त नलिका वितरण प्रणाली) कामाचा शुभारंभ बुधवारी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यामुळे पाण्याची गळती थांबून डिगस, आवळेगांव परिसरातील शेतीला मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. या पाण्याचा शेतकऱ्यांनी फायदा घेऊन भातशेतीसह अन्य विविध पिकांचे उत्पादन घेऊन आर्थिक सक्षम बनावे. त्यासाठी लागेल ते सहकार्य आपण करू असे आ.वैभव नाईक यांनी सांगितले.
आ.वैभव नाईक यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत समस्या जाणून घेत त्या तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच शेतीसाठी वेळेत पाणीपुरवठा करण्याबाबतच्या सूचना यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या तलावाचे पाणी कालव्याद्वारे डिगस व आवळेगांव भागात शेतीसाठी सोडले जाते. या ठिकाणचे दोन्ही कालवे उघडे असल्याने तसेच ते नादुरुस्त झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊन पाणी वाया जात होते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतीसाठी पाण्याचा तुटवडा भासत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत होती. याची दखल आ.वैभव नाईक यांनी घेत कालवा पुनर्स्थापना अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. या योजनेंतर्गत ४ कि.मी. अंतरावर बंदीस्त पाईपलाईन केली जाणार आहे. त्यामुळे पाण्याची गळती थांबून शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. डिगस व आवळेगांव परिसरातील शेती सिंचनाखाली येणार आहे.
यावेळी जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख अमसेन सावंत, उपसभापती जयभारत पालव, डिगस सरपंच सतीश सूर्वे, आवळेगाव सरपंच सुनील सावंत, बबन बोभाटे, बाळा पवार, राजू पवार, पाटबंधारे विभाग सावंतवाडी अभियंता संतोष कविटकर, शाखा अभियंता विलास गोसावी, तांत्रिक सहाय्यक महेश आंदुर्लेकर, ठेकेदार येडगे, बाळू पालव आदींसह शेतकरी उपस्थित होते.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_