गेळे प्रश्न राजकारण नको ग्रामस्थांच्या जीवनाचा प्रश्न-सागर ढोके
*🛑गेळे प्रश्न राजकारण नको ग्रामस्थांच्या जीवनाचा प्रश्न-सागर ढोके*
*🛑आमचे नेते संदिप गावडे यांच्यावर टीका करण्या इतपत तुमची राजकीय उंची नाही*
*नारळाला हात लावतो,देवाला साक्ष ठेवतो असे भावनिक आवाहन करुनच आज पर्यंत जनतेची दिशाभूल*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२१:-* गेळे जमीन प्रश्न हा राजकीय विषय नाही. त्यामुळे देवाला हात जोडतो, नारळाला हात लावतो, असे सांगून कोणी लोकांची दिशाभूल करू नये. अन्यथा तुमच्या विरोधात पुरावे दाखवावे लागतील, असा इशारा गेळे सरपंच सागर ढोकरे यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
दरम्यान आमचे नेते संदीप गावडे यांच्यावर टिका करण्याची तुमची राजकीय उंची नाही. त्यामुळे बोलायचेच असेल तर तुमच्या नेत्यांना पाठवा. “ये तुम्हारे बस की बात नही..!! त्यांनी खोटं बोलून आयुष्यभर राजकारण केलं. त्यांनी त्यांच्या आजूबाजूला बघावं तुमच्या पापाचे परिणाम सगळा मतदारसंघ भोगत आहे, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला. संदीप गावडे व गेळे ग्रामस्थ यांच्या भूमिकेवर नुकतीच शिंदे गटाने पत्रकार परिषद घेऊन टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी श्री. ढोकरे यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी महेश गवस उपसिस्थित होते. यावेळी ढोकरे पुढे म्हणाले, गावचा जमीन प्रश्न हा राजकीय विषय नाही. येथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे अशा प्रश्नांमध्ये कोणीही घाणेरडे राजकारण करू नये. लोकांना जमीन मिळणे ही काळाची गरज आहे. मात्र त्या ठिकाणी खोटे बोलून लोकांची दिशाभूल केली जात आहे. मात्र काही झाले तरी आम्ही ते खपवून घेणार नाही. या ठिकाणी चर्चा करण्यासाठी गावाच्या माध्यमातून समिती गठीत करण्यात आली आहे. यात संदीप गावडे यांच्यासह आनंद गावडे व सरपंच म्हणून माझी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आमच्याशी थेट बोलावे. दरम्यान त्या दिवशी केसरकर यांच्याकडून आयोजित करण्यात आलेली बैठक ही प्रशासकीय नव्हती. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी हजर राहिलो नाही. परंतु या प्रशासकीय बैठक आयोजित करून त्या ठिकाणी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना बोलवल्यास नक्कीच आम्ही त्या बैठकीस उपस्थित राहू, असे ढोकरे म्हणाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

