गोव्यात आले असता त्यांची सदिच्छा भेट घेऊन मडगाव येथील टुरिस्ट रेसिडेन्सी मध्ये गोवा हिंदी अकादमीच्या वतीने अध्यक्ष प्रा.सुनील शेट यांनी केले स्वागत
केंद्रीय हिंदी संचालनालयाचे उप संचालक हुकुम चंद मीणा यानी गोव्यात आले असता त्यांची सदिच्छा भेट घेऊन मडगाव येथील टुरिस्ट रेसिडेन्सी मध्ये गोवा हिंदी अकादमीच्या वतीने अध्यक्ष प्रा.सुनील शेट यांनी केले स्वागत
कुठठाळी,ता,17 वार्ताहर:
केंद्रीय हिंदी संचालनालयाचे उप संचालक हुकुम चंद मीणा यानी गोव्यातील एका संस्थेच्या पाहणी साठी अधिकृत भेट दिली असता त्यांची सदिच्छा भेट घेऊन मडगाव येथील टुरिस्ट रेसिडेन्सी मध्ये गोवा हिंदी अकादमीच्या वतीने अध्यक्ष प्रा.सुनील शेट यांनी यथोचित स्वागत करून सन्मान करण्यात आला.यावेळी त्यांच्यासोबत आलेले पाहणी समितीचे सदस्य, श्री संत सबता माली ग्रामीण महाविद्यालय फुलंबरी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महाराष्ट्र चे प्रो. सुरेश माधवराव मुढे यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर गोवा हिंदी अकादमीचे सचीव उदय नाईक, खजिनदार सौ.कांचन बोरकर, सहकोषाध्यक्ष सौ.सुनयना शेट, कार्यकारणी सदस्य सौ.रंजना नाईक उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना श्री. मीणा यानी गोवा हिंदी अकादमीचे आभार मानून हिंदी साठी सुरू करण्यात आलेले कार्यक्रम व कार्य असेच चालू ठेवा, यासाठी आपण योग्य सहकार्य करू असे आश्वासन दिले.शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
शेवटी सचीव उदय नाईक यानी आभार प्रदर्शन केले.