कसाल न्यू इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यांच्या महामार्ग क्रॉसिंग पर्यायाची खा. राऊत यांच्या कडून पहाणी..

▪️ठेकेदार गौतम व सलिम शेख यांना आरसीसी नाला बांधकाम करण्याच्या खा. राऊत यांच्या सुचना..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कुडाळ,दि.१३: तालुक्यातील कसाल न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय येथे हजारो विद्यार्थ्यांना नव्याने बांधण्यात आलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचा रस्त्याची समस्या भेडसावत असल्याने रस्ता क्रॉस करताना अडचणी येत आहेत. याबाबत आज पाहणी करण्यासाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत, दिलीप बिल्डकॉनेचे अधिकारी गौतम, व सलीम शेख, आदीसह शालेय कमिटी उपस्थित होती.

कसाल मध्ये न्यू इंग्लिश स्कूल कसाल एकमेव असे शिक्षण घेण्यासाठी मोठे विद्यालय असल्याने याठिकाणी दशक्रोशीतील गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत. बाराशे विद्यार्थी पाचवी ते बारावीच्या वर्गांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. मात्र, नव्याने बनविण्यात आलेल्या महामार्ग रस्त्याच्या रुंदीकरणामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना महामार्गावरून रस्ता क्रॉस करताना कोणताही पर्याय ठेकेदाराकडून ठेवण्यात आलेला नाही. दोन वेळा  यासाठी आंदोलनही करण्यात आले होते. गेली दोन वर्ष अनेक वेळा पाठपुरावा करूनही महामार्गाच्या ठेकेदाराने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना अनेक अडचणी येत असून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी रस्त्यावर (ओव्हर ब्रिज) किंवा सर्विस रस्ता तयार करावा अशी मागणी गेली दोन वर्ष महामार्गाचे काम सुरू असल्यापासूनच संस्थाचालक तसेच पालक व ग्रामस्थांच्यावतीने, चेअरमन, अधिकारी, पदाधिकारी करत आले आहेत. मात्र, याकडे महामार्ग दिलीप बिल्डकॉन ठेकेदाराने पूर्णतः दुर्लक्ष केल्याने आता संस्थेला व नागरिकांना याकडे कडक पाऊल उचलावे लागत आहे.

शाळा संस्थेचे संस्थापक, सचिव, संचालक मंडळाने आज शाळेचा विद्यार्थ्यांबाबत  येणाऱ्या अडचणींंच्या समस्यांंचा पाढाच खासदार विनायक राऊत यांच्या समोर वाचला.

यावेळी कसाल हायस्कूल गेट महामार्गाजवळ आरसीसी नाला (ब्रीजची) मागणी संस्थेने केली असता खासदार राऊत यांनी महामार्ग ठेकेदार गौतम व सलिम शेख यांना आदेशही दिले व लवकरच आरसीसी नाला (ब्रिज) बांधकाम करण्याचा सुचना दिल्या. तसेच कसाल बालमवाडी व कसाल हायस्कूल पर्यंत सर्विस रोडची गरज असून हजारो विद्यार्थी या सर्विस रस्त्याने जाऊ शकतील, महामार्ग ओलांडताना विद्यार्थीना त्रासदायक होऊ नये हा त्यामागचा उद्देश असल्याने आपल्या व्यथा संस्थेच्या वतीने महामार्ग ठेकेदार व खासदार राऊत यांच्याकडे मांडण्यात आल्या.

यावेळी संस्था सचिव यशवंत परब, अवधूत मालणकर, नवीन बांदेकर, नंदकिशोर गावडे, पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमळकर, उपसरपंच दत्‍ताराम सावंत, छोटू पारकर, मुख्याध्यापक गुरुदास कुसगांंवकर, डॉ. सुर्यक्रांत बालम, संतोष (बाळा) कांदळकर, पाडुरंग गावडे, आदी उपस्थित होते.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!