सावंतवाडी नगरपालिकेला ३३ लाखाचा निधी मंजूर

सावंतवाडी दि.०९-:खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे सावंतवाडी नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत सुमारे ३३ लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली आहे.

सावंतवाडी शहरातील विविध विकास कामांसाठी खासदार विनायक राऊत यांनी पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार विनायक राऊत यांचे जेष्ठ नगरसेविका अनोरोजीन लोबो, नगरसेवक जयेंद्र परूळेकर, नगरसेवक बाबू कुडतरकर, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, नगरसेविका भारती मोरे, नगरसेविका दिपाली सावंत, नगरसेविका माधुरी वाडकर यांनी विशेष आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!