कमाल बेबल यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेऊया; प्रशांत यादव यांची खेर्डी वासीयांना भावनिक साद
▪️सुखाई परिवर्तन पॅनलची प्रचारात जोरदार सरशी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.१३: सामाजिक क्षेत्रात काम करीत असतांना कमाल बेबल यांनी कधीही कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता सामाजिक कार्य केले. कमाल बेबल यांना अपेक्षित असलेले काम करून त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा आपण पुढे नेऊया अशी भावनिक साद पॅनल प्रमुख प्रशांत यादव यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, मुस्लिम समाजाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते कमालशेठ बेबल आज आपल्यात नाहीत, याचे शल्य आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटूंबासह गावचे मोठे नुकसान झाले आहे. वीस वर्षे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता त्यांनी काम केले. आज त्यांच्या घरासमोर कॉर्नर सभा घेताना डोळे भरून आले आहेत. मात्र, त्यांच्या मुलीसह सुकाई परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून आणणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे भावनिक उदगार पॅनलचे प्रमुख व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी काढले.
सोमवारी खेर्डी येथे कमालशेठ बेबल यांच्या निवासस्थानी सुकाई परिवर्तन पॅनलच्या प्रचारासाठी जोरदार कॉर्नर सभा झाली. यावेळी पॅनल प्रमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, विनोद भुरण, विजयराव देसाई, वासुअप्पा मेस्त्री, सुनील मेस्त्री, रुपेश आवले, सितप गुरुजी, उमर बेबल, खतीब चौगुले, आबु चौगुले,नाना लकेश्री, लतीफ बेबल, मंगेश लकेश्री, उमेदवार मनोहर शिगवण, स्वरा शिरगावकर, अमीना बेबल आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना प्रशांत यादव म्हणले की विरोधक माझा चमत्कार चालणार नाही, असे म्हणत आहेत. मात्र, या वॉर्ड क्रमांक ६ मधूनच माझा चमत्कार चालणार आहे. १८ तारखेला निकाल बघा.ज्यांना वार्डने दोनवेळा निवडणूक दिले,त्यांनी मतदारांचा विश्वासघात केला, त्यामुळे आता इथले मतदार त्यांना उभे करणार नाहीत. मतदारांना गृहीत धरू नका, असेही ते म्हणाले. एक महिला सरपंच असताना तिच्यावर अविश्वास ठराव आणला गेला, हे राज्यात नावलौकिक असणाऱ्या खेर्डीसाठी शोभणीय नाही, असेही प्रशांत यादव म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व पॅनल प्रमुख जयंद्रथ खताते यांनीही विरोधकांवर निशाणा साधत समाचार घेतला. खेर्डीच्या जनतेने नाकारले आहे, ते आमच्या विरोधी पॅनलचे नेतृत्व करीत आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषदेतून हे संपले असे सांगत जनतेने नाकारलेले पॅनलचे काय नेतृत्व करणार, असा टोला हाणला. सुकाई परिवर्तन पॅनलची केवळ सत्ता येऊन उपयोग नाही तर आपल्याला सतराच्या सतरा जागा जिंकून विक्रम करायचा आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
यावेळी वासुअप्पा मेस्त्री यांनी विरोधकांच्या जाहीरनाम्याची चिरफाड केली. सुकाई परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन सितप गुरुजी यांनी केले.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_