गांजा सेवन करताना पाचजण ताब्यात
*🛑गांजा सेवन करताना पाचजण ताब्यात*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१३:-* सिगारेटमधून गांजा ओढतांना सावंतवाडी पोलिसांच्या पथकाने पाचजणांना त्यांच्या दुचाकीसह कोलगाव येथे सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले. पोलिसांना पाहताच त्यांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला. तरीही पोलिसांनी त्यांना ताब्यात घतले. यात अमन इम्तियाज बिराणी (२२, रा. माठेवाडा-सावंतवाडी), आसिफ रफिक जकाती (२६, रा. कोकण कॉलनी), रेहान बिरबल शेख (१८, सालईवाडा-सावंतवाडी) व दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदशनाखाली उपनिरीक्षक सरदार पाटील, हवालदार प्रवीण वालावलकर, मनोज राऊत यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे गांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शहरातील एका परिसरात काही युवक गांजा विक्री करतात. तसेचसिगारेटमधून गांजा सेवन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गेले दोन दिवस पोलीस पथक त्यांच्या मागावर होते. सोमवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या आदेशानुसार पोलिसांचे पथक शहर व परिसरात गस्ती घालत असताना काही युवक सिगारेटमधून गांजा ओढत असताना आढळले. पोलिसांची चाहूल लागताच रिकामी पाकीट तेथेच टाकून त्यांनी पलायन केले. मात्र, पोलिसांनी हालचाल करत दुचाकीसह त्यांना ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
अवैध गांजा विक्री करणाऱ्या टोळीपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने पोलीस प्रयत्नशील आहेत. शहरातील आडमार्गावर अमली पदार्थाची नशा करणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांचे गस्ती पथक तैनात राहणार आहे, असे, निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

