कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

चौकुळ वासियांचा कबुलायतदार गावकर प्रश्न निकाली काढण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी कंबर कसली

*🛑चौकुळ वासियांचा कबुलायतदार गावकर प्रश्न निकाली काढण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी कंबर कसली*

*🛑१४ ऑगस्ट ला वन विभाग व महसूल विभाग यांनी मंत्रालयात आयोजित केली बैठक**

*🛑सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांच्या पाठपुराव्याला यश*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१३:-* गेळे वासियांचा कबुलायतदार गावकर प्रश्न ऐरणीवर वर असताना व त्या प्रश्नातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतानाच शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी चौकुळ कबुलायतदार गावकर प्रश्न निकाली काढण्यासाठी कंबर कसली असून 14 ऑगस्ट ला वन विभाग व महसूल विभागा ने महत्वपूर्ण बैठक मंत्रालयात आयोजित केली आहे.यासाठी सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या कडे सतत पाठपुरावा केला होता.
बैठक आयोजन करणारा विभाग निमंत्रक महसूल व वन विभाग मंत्री-शालेय शिक्षण, मंत्री (महसूल), मंत्री (वने), अपर मुख्य सचिव-महसूल, प्र.सचिव-वने, विभागीय आयुक्त-कोकण, जिल्हाधिकारी-सिंधुदुर्ग, मौजे चौकुळ ग्रामस्थांचे ४ प्रतिनिधी व विषयानुषागाने संबंधित अधिकारी
वरील बैठकीचे आयोजन आपल्या विभागाने करावे त्याचप्रमाणे वरील निमंत्रितांना बैठकीस उपस्थित राहण्याबाबत विभागाने कळवावे.असे म्हटले आहे.
बैठकीस संबंधीत विभागाचे सह सचिव/उप सचिव यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे अधिकारी उपस्थित राहणार नाहीत याची दक्षता विभागाने घ्यावी. तसेच सदर बैठकीस व्ही.सी. लिंकची आवश्यकता असल्यास एक दिवस अगोदर या कार्यालयास कळविण्यात यावे..बैठकीपूर्वी विभागाने संबंधीत निमंत्रितांशी संपर्क साधून सदरहू निमंत्रित बैठकीस उपस्थित राहणार आहेत किंवा कसे ? याची खातरजमा करावी. त्याबाबतची माहिती मुलाखत कक्षास देण्यात यावी. संदर्भाधीन विषयाबाबतची सविस्तर टिप्पणी व निमंत्रितांची यादी (Soft Copy/Email-cmengsection@maharashtra.gov.in) नमूद केलेल्या विवरणपत्र-१ मध्ये, आठ प्रती मुलाखत कक्ष, मंत्रालय येथे तात्काळ पाठवावी. सविस्तर टिप्पणीमध्ये याच विषयाबाबत यापूर्वी झालेल्या बैठकांमध्ये घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा तपशील देखील अंतर्भूत करावा,
बैठक संपन्न झाल्यानंतर बैठकीचे कार्यवृत्त/इतिवृत्त मा. मुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेसाठी एक आठवड्याच्या आत सादर करावे. बैठकीमधील मुद्दे अन्य विभागांशी संबंधित असले तरी त्याबाबतचे इतिवृत्त बैठकहाताळणाऱ्या विभागाने तयार करावे. बैठकीचे कार्यवृत्त/इतिवृत्त विहित कालावधीत पाठविण्याची जबाबदारी विभागाचे सचिव यांच्यावर राहील. इतिवृत्त मान्यतेनंतर त्याची एक प्रत मुलाखत कक्षास पाठविण्याची व्यवस्था करावी, असे उप सचिव विनित दळवी यांनी कळविले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!