सागवानाची अवैध तोड आरोपातून निर्दोष मुक्तता
*🛑सागवानाची अवैध तोड आरोपातून निर्दोष मुक्तता*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-०८:-* शासकीय राखीव वनातील सागवान वृक्षाची अवैध तोड करून वाहतूक केल्याच्या आरोपातून उत्तम यशवंत पंदारे (रा. आंजिवडे), सखाराम कृष्णा शेडगे (रा. वसोली), वसंत बाबाजी धुरी व प्रकाश तातोबा शेडगे (दोन्ही रा. नेरुर क. नारुर) यांची येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. आर. ढोरे यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींतर्फे अॅड. विवेक मांडकुलकर, अॅड. प्रणाली मोरे यांनी काम पाहिले. अॅड. भुवनेश प्रभूखानोलकर व अॅड. वृषांग जाधव यांचे सहकार्य लाभले. २१ सप्टेंबर २०१८ रोजी वनरक्षक (आंजिवडे) व वनरक्षक (शिवापूर) हे दोघे आंजिवडे राखीव क्षेत्रात गस्तीवर होते. तेव्हा त्यांना कटर मशीनचा आवाज आला. ते त्या दिशेने गेले असता, चार। व्यक्ती कटर मशीनने सागाचे झाड कापताना आढळले. त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, उत्तम पंदारेने कटर मशीन आंजिवडे वनरक्षकांच्या अंगावर फेकून आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले, अशी फिर्याद कुडाळ पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार भारतीय वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. त्यांच्या जबाबातील तफावत व आरोपींतर्फे अॅड. मांडकुलकरांचा युक्तिवाद ग्राह्य मानून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. आर. ढोरे यांनी चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_