कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 आंबोली मान्सून पर्यटन महोत्सवाचा यावर्षी शासनाला पडला विसर-अनिल चव्हाण* *🛑 तत्कालीन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी तीन वर्षासाठी केले होते नियोजन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴आंबोली , दि-३०:-* जागतिक पर्यटन स्थळांशी आंबोलीचे नाव जोडले जावे या उद्देशाने आंबोली च्या नावाने “आंबोली पर्यटन महोत्सव” तीन वर्षासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सुरु करण्याचे नियोजन केले होते.मात्र प्रशासनाने तो यावर्षी गुंडाळला आहे. एकीकडे शासनाचे मंत्री अंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाची घोषणा करतात मात्र त्या दृष्टीने कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी स्व कल्पनेतून ही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो राजकीय इच्छाशक्तीपुढे चालला नाही.त्यामुळे शासनाला विसर पडला आहे की पर्यटन धोरणासाठी काही करायचे नाही फक्त निधीतून ठेकेदार पोसायचे असा सवाल समाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार अनिल चव्हाण यांनी पर्यटन संदर्भात विचारला आहे.
गत वर्षी चिपी विमानतळ उदघाट्नवेळी उदघाट्नवेळी राज्याच्या पर्यटन खात्याचे एम डी आणि सचिव आले असताना जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी एक महत्वपूर्ण पाऊल टाकण्या संदर्भात जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांची चर्चा होऊन त्यांनी येथील पर्यटन स्थळांना प्रसिद्धीसाठी महोत्सवाचे आयोजन केले होते. जगभरात कान्स महोत्सव,बर्लीन महोत्सव,कार्निवल , अशा प्रकारे त्या त्या नावाने महोत्सव आहेत जागतिक दर्जाचे आहेत.त्याच पार्शवभूमीवर भंडारदरा,नाशिक आणि आंबोली या थंड हवेच्या ठिकाणच्या नावाने महोत्सव नियोजन पर्यटन महामंडळाने मंजुरी दिली होती.त्यानुसार आंबोली पर्यटन महोत्सव नियोजन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले होते.याचे उदघाट्न शिक्षण मंत्री दीपक केसरकर,पालकमंत्री रवींद्र चव्हाण, तत्कालीन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी,पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल,नियोजन अधिकारी,पर्यटन प्रकल्प अधिकारी श्री.हेडे यांनी केले होते.यानंतर याठिकाणी तीन दिवस विविध कार्यक्रम ही झाले. यासाठी सुमारे २ कोटी निधी खर्चाचे नियोजन केले.२0 लाख निव्वळ उदघाट्नावर खर्च झाले. मात्र पर्यटन प्रकल्प अधिकारी श्री.हेडे यांचे अतिशय खराब नियोजन होते.त्यांनी सर्व नियोजन् हे स्थानिकांना सामावून आणि विश्वासात न घेतल्याने फक्त निधीचा चुराडा केला. मात्र हा पाहिलाच प्रयत्न असून देशभरातील टूर्स आणि ऑपरेटर यांना आणून आंबोलीचे पर्यटन वाढवण्याचा यामागे हेतू होता.तसेच तीन वर्षासाठी हा मान्सून आंबोली पर्यटन महोत्सव आयोजन केला असल्याचे जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी आंबोलीत सांगितले होते.तसेच पर्यटकांना सायकल घेण्यासाठी दीड कोटी निधी मंजूर केल्याचेहि जाहीर केले होते.वन अमृत योजना देखील मंजूर केल्याचे सांगितले होते. मात्र यावर्षी जिल्हा प्रशासनाचे कोणतेही नियोजन याप्रकारचे नाही. त्यामुळे आंबोलीत अंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन करणार जागतिक स्थळ करणार अशा प्रकारच्या घोषणा या हवेत विरल्या आहेत. जिल्हा प्रशासनाला आधीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा कामकाज आणि निधी देखील मंजूर केलेला नेमका कोणत्या कामात वळवला आहे हेदेखील समजणें आवश्यक आहे. थोडक्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जरी प्रयत्न केले तरी इच्छाशक्ती मुळे पर्यटन विकास आणि इथला विकास रखडला आहे हे मात्र निश्चित.त्यामुळे फक्त अधिकाऱ्यांच्या नावे खापर फोडून जबाबदारी ढकलने हे इथले राजकीय वक्तव्य आता बोथट झाले आहे. कोटिच्या कोटी आकडे जाहीर केले तरी आंबोली रस्त्यात अनेक खड्डे आहेत घाट रस्ता दयनीय आहे वाहतुकीसाठी सध्या.आंबोली आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त आहेत.याठिकाणी एमबीबीएस च्या पोस्ट ची आवश्यकता होती.आरोग्य केंद्रात ७ इन्व्हर्टर बंद आहेत.समाजिक बांधिलकी कडून डिलिवरी रूम मध्ये बसवण्यात आला.तंत्रज्ञ,प्रयोगशाळा तज्ञ,औषधनिर्माता,परिचारिका,आरोग्यसेवक,शिपाई अशी सगळी पदे रिक्त आहेत.औषध साठा पुरेसा नाही. विजेची समस्या कायम आहे.एकच कर्मचाऱ्यावर भार आहे.मागणी करून देखील कर्मचारी वाढवत नाही.विज उपकेंद्र मंजूर असून देखील वर्षभरानंतर होत नाही. बस स्थानकाकडे पाणी वाहत असल्याने व्यवस्थित नाही.कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न गेली २५ वर्षे रखडवलेला आहे. वनखात्याचे अजब कारनामे सुरु आहेत.वन खात्याचा कारभार विचित्र अजब सुरु आहे.त्याची चौकशी वरिष्ट अधिकाऱ्यांकडून होत नाही. इथल्या मूळ भूमिपुत्रावर मात्र वन खत्याने अन्याय केला आहे. आंबोलिच्या सौन्दर्य नैसर्गिक साधन सामुग्रीवर इथे लोकांचा व्यवसाय चालतो.आंबोलीचा विकास आंतरराष्ट्रीय जागतिक विकास हा निव्वळ फार्स आहे. असे अनिल चव्हाण यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना सांगितले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!