आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 बुद्धिबळ खेळाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या विकासासाठी होईल ; विकास गोवेकर

🛑 मुक्ताई ॲकेडमीच्या वतीने मुला मुलींसाठी बुद्धिबळ प्रशिक्षण शिबीराचे करण्यात आले होते आयोजन..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०२:- मुक्ताई ॲकेडमीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जिल्ह्यातील मुलांसाठी व मुलींसाठी बुद्धिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले होते.शिबीराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे हस्ताक्षर तज्ञ श्री.विकास गोवेकर यांच्या हस्ते आणि श्रीमती अनुपमा शेटगे, राष्ट्रीय बुदधिबळ खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर, ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर, उपाध्यक्षा सौ.स्नेहा पेडणेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.शिबीरात देवगड, कणकवली, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी येथून आलेल्या जिल्ह्यातील 54 विदयार्थ्यांनी सहभाग घेतला.सुरुवातीला श्री.कौस्तुभ पेडणेकर सरांनी ॲकेडमीत नियमित प्रशिक्षण घेणारे पारितोषिक प्राप्त खेळाडू यश सावंत, साक्षी रामदुरकर, गार्गी सावंत, चिदानंद रेडकर आणि नवीन विदयार्थ्यांचे स्वागत केले.या वेळी पेडणेकर सरांनी पुढील महिन्यापासून होणा-या जिल्हास्तरीय ते राष्ट्रीय स्तरावरील शालेय व इतर स्पर्धां आणि त्यामधून मिळणाऱ्या गुणांबाबत विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.

श्री.विकास गोवेकर मार्गदर्शन करताना म्हणाले की “विदयार्थ्यांनी बुद्धिबळ रोज खेळावे.ज्यामूळे एकाग्रता वाढते आणि त्याचा उपयोग अभ्यासामध्ये होतो.मुलं निर्णयक्षम होतात.”मुक्ताई ॲकेडमीत पुढील महिन्यात हस्ताक्षर सुधार वर्गाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.सहभाग घेणाऱ्या विदयार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आली.सौ.स्नेहा पेडणेकर यांनी आभार मानले.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!