कुडाळशासकीयशैक्षणिकसामाजिकसिंधुदुर्ग

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार विरोधी जनजागृती कार्यशाळा संपन्न.. 

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.०४: आई वडिलांसारखे हितचिंतक नाही. आपल्या समस्या आई-वडिलांशी शेअर करा. अप्रिय घटना आई-वडिलांना सांगा. गप्प राहणे ही पुढच्या अन्याय-अत्याचाराची, शोषणाची नांदी ठरू शकते असे उद्गार कुडाळ पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस समुपदेशक स्मिता गवस यांनी काढले. ते बॅ. नाथ शिक्षण संस्थेत आयोजित महिला व बालकांना वरील लैंगिक अत्याचार या संदर्भातील कार्यशाळेच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये अनोळखी व्यक्तीची फेसबुक वरील मैत्री आपल्याला गोत्यात आणू शकते. द्वयार्थी कॉमेंट्सना प्रतिसाद देऊ नका. मित्र-मैत्रिणींच्या चुकीच्या गोष्टीला साथ देऊ नका. चुकीच्या वाटेवरील पाऊले वळवून सन्मार्गाला असतो तोच खरा मित्र. असे मित्र जोडा, असे मित्र पारखून घ्या असे सांगत आजच्या काळात महिला, बालिका-बालक यांच्यावर होणारे अत्याचार कसे रोखता येईल? तरुण पिढीने व्यसनापासून कसे दूर राहिले पाहिजे ? ..हे सांगत उपस्थितांना महिला व बालक यांच्यावरील लैंगिक अत्याचार-शोषणाच्या संदर्भात मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर कुडाळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर कोरे, बॅ. नाथ पै महिला महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य अरुण मर्गज, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य मीना जोशी, सी.बी.एस. इ.च्या इन्चार्ज प्रियांका सिंह, पल्लवी कामत आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय मनोगतामध्ये शंकर कोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यसनाच्या धुंदीत राहण्यापेक्षा कर्तव्यपूर्ती तिच्या धुंदीत राहा. व्हाट्सअप वरील मैत्रीच्या, पोस्टचा प्रेमात न पडता शैक्षणिक उन्नती कडे लक्ष द्या. भारतीय संस्कृती व संस्कार यांचा आदर करा. अनोळखी व्यक्तींशी मैत्री जोडू नका. आपल्या अवतीभोवती असणाऱ्यांचे हेतू ओळखा. बॅड टच, गुड टच यातला फरक लक्षात घ्या आणि व्यक्तीच्या हेतू बाबत सजग राहा. मीडियातील फसव्या मैत्री पासून लांब रहा. अप्रिय घटना घडायच्या नसतील तर इतरांनी दिलेल्या धमक्या, ब्लॅकमेलिंग वेळीच घरातल्यांसोबत शेअर करा. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा. त्यातून नक्कीच योग्य मार्ग निघेल. असे सांगत सर्वांना आपल्या वरील अत्याचार आपणच रोखू शकतो. असा संदेश दिला दिला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अरुण मर्गज यांनी केले तर पल्लवी कामत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी कुडाळ पोलिस स्टेशनचे रुपेश सारंग, काका करंगुटकर व इतर पोलीस कर्मचारी, महिला महाविद्यालयाच्या महिला विकास कक्ष प्रमुख प्रा.तृप्ती नाईक, सहकारी मनाली मुळीक, युगा परब, प्राजक्ता जाधव, प्रीतम वालावलकर प्रसाद कानडे, योगेश येरम व नर्सिंग चे स्टाफ, विद्यार्थी विद्यार्थिनी, सीबीएसई स्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!