सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदान; जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी
▪️ओरोस येथे पत्रकार दिन सोहळा व पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०७: वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा आदर्श घेऊन जिल्ह्यातील पत्रकार समाज परिवर्तनाचे काम करीत आहे. तसेच जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदान आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले. पत्रकार दिन आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आणि सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार दिन सोहळा व पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रम सिंधुदुर्गनगरी ओरोस फाटा येथील इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालय येथे जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद अध्यक्ष सौ समिधा नाईक जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर ज्येष्ठ विधि तज्ञ अजित भणगे जिल्हा परिषद सदस्य अंकुश जाधव पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, ओरोस सरपंच प्रीती देसाई, जिल्हा माहिती अधिकारी फारुख बागवान ,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे उपाध्यक्ष बाळ खडपकर जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे ,अण्णा केसरकर ,माधव कदम, संतोष वायंगणकर ,उमेश तोरसकर ,पत्रकारांचे गुणवंत विद्यार्थी तसेच पुरस्कार प्राप्त पत्रकार उपस्थित होते यावेळी पाचवी व आठवी मध्ये शिष्यवृत्ती मिळालेल्या तसेच दहावी बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या पत्रकारांच्या मुलांचा सन्मान पत्र, पुष्पगुच्छ, देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला माधव कदम यांनी मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक लिहिले आहे याच्या आवृत्तीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी आदर्श पत्रकार पुरस्कार सिंधुदुर्ग पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे सिंधुदुर्ग नगरी ज्येष्ठ पत्रकार महादेव परांजपे, आरोंदा कै. अरविंद शिरसाट ,स्मृती पुरस्कार तेजस देसाई दोडामार्ग. उकृष्ट पत्रकार पुरस्कार दिनेश परब वेंगुर्ला ,उकृष्ट छायाचित्रकार अनिकेत उचले कणकवली, ग्रामीण पत्रकार दिनेश साटम देवगड यांना मिळाले असून त्यांना मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले तसेच जिल्हा पत्रकार संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार संघाचा गौरव करण्यात आला.
तरळे येथील मंडळाने पौभुर्लो येथील बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाची स्वच्छता केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर ,जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक जिल्हा अध्यक्ष गणेश जेठे , ज्येष्ठ विधी तज्ञ अजित भणगे यांनी मार्गदर्शन केले प्रास्ताविक उमेश तोरसकर यांनी केले सूत्रसंचालन दत्तप्रसाद वालावलकर यांनी केले तर आभार देवयानी तोरसकर यांनी मानले.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_