शस्त्र परवाना धारकांनी शस्त्र परवाने नुतनीकरण करुन घ्यावेत; अपर जिल्हादंडाधिकारी

▪️एकाच दिवशी गर्दी न करता तालुकानिहाय तारखांना शस्त्र परवान्यासह उपस्थित रहावे..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सदगुरु घावनळकर

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०४: जिल्ह्यातील ज्या शस्त्र परवाना धारकांच्या परवान्याची मुदत ३१ डिसेंबर २०२० रोजी संपत आहे, अशा शस्त्र परवाना धारकांनी शस्त्रे परवाने नुतनीकरणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या सिंधुदुर्गनगरी येथे असलेल्या सेतू सुविधा केंद्रात दुपारी १:०० वाजेपर्यत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

शस्त्र परवाना नुतनीकरणासाठी एकाच दिवशी गर्दी होऊ नये म्हणून परवाने नुतनीकरणासाठी तालुकानिहाय तारखा ठरवून देण्यात आल्या आहेत. त्या तारखांनाच संबंधित तालुक्यातील शस्त्र परवाना धारकांनी शस्त्र परवान्यासह उपस्थित रहावे. शस्त्र परवाना नुतनीकरणासाठी तालुकानिहाय तारखा पुढील प्रमाणे आहेत. सावंतवाडी दि. १,२ व ३ डिसेंबर २०२०, दोडामार्ग दि. ७ व ८ डिसेंबर २०२०, मालवण दि. १० व ११ डिसेंबर २०२०, कणकवली दि. १४ व १५ डिसेंबर २०२०, कुडाळ दि. १७ व १८ डिसेंबर २०२०, देवगड दि. २१,२२ व २३ डिसेंबर २०२०, वैभववाडी दि. २८ व २९ डिसेंबर २०२०, वेंगुर्ले दि. ३० व ३१ डिसेंबर २०२०,

शस्त्र परवाना नुतनीकरणासाठी पुढील प्रमाणे कागदपत्र सादर करावीत : १) परवाना क्रमांक, शस्त्राचा प्रकार व क्रमांक लिहून नूतनीकरणासाठी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा. २) मुळ शस्त्र परवाना अर्जासोबत जोडावा ३) शस्त्र पडताळणी केल्याबाबतचे संबंधित पोलीस ठाणे यांच्याकडील प्रमाणपत्र ४) परवानाधारक हयात असल्याबाबतचा सरपंच, पोलीस पाटील, नगराध्यक्ष याच्याकडील दाखला ५) परवानाधारक सैनिक, माजी सैनिक असल्यास याबाबतचा पुरावा सोबत जोडावा ६) परवाना नुतनीकरण हे पाच (०५) वर्षाकरीता असणार असल्याने, प्रतिवर्ष ५०० रुपये याप्रमाणे ५ वर्षाकरीता २ हजार ५०० रुपये फी शासन जमा करणे आवश्यक आहे.

शस्त्र परवाना नुतनीकरणाचे अर्ज पोस्टाव्दारे किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्विकारले जाणार नाहीत. तसेच नुतनीकरण झालेले शस्त्र परवाने पोस्टाने पाठविले जाणार नाहीत. तरी संबंधितानी विहित वेळेत आपले शस्त्र परवाने नुतनीकरण करुन घ्यावेत, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

*💥……… प्रवेश सुरु ……… 💥*

_🌈तंत्र शिक्षण क्षेत्रात करियर करण्याची संधी.._

*🔥डिप्लोमा इन इलेक्ट्रिशीयन🔥*
_💫कालावधी – १ वर्ष_
_💫शैक्षणिक पात्रता – किमान १० उत्तीर्ण_

*🤷🏻‍♂️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*इन्स्पायर एज्यूकेशन, सावंतवाडी (7466A)*
*_📱संपर्क : 9422896699_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!