आरोग्यकणकवलीशासकीयसिंधुदुर्ग

कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सहदेव पाटील ब्रेन हॅमरेजमुळे कोमात..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴​कणकवली,दि.०६: उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सहदेव पाटील हे ब्रेन हॅमरेजमुळे कोमात गेल्याने त्यांना कोल्हापुर येथील सिद्धांत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉ. पाटील कोल्हापुर येथे गावी गेले असता, दोन दिवसांपुर्वी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना कोल्हापुर येथील सिद्धांत हॉस्पिटलला दाखल करण्यात आले.

वैद्यकीय सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर पाटील यांचे ब्रेन हॅमरेज होत, ते कोमात गेल्याचे सांगण्यात आले. सध्या ते रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असुन त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे वैद्यकीय सुत्रांकडून सांगण्यात आले. डॉक्टर पाटील हे  नामवंत सर्जन असुन, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत त्यानी शेकडो शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही डॉक्टर पाटील यांनी लीलया पार पाडत कणकवली, देवगड, वैभववाडी सह जिल्ह्यातील अनेक गोरगरीब रुग्णांना दिलासा दिला आहे. डॉक्टर पाटील लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा रुग्णसेवेसाठी सज्ज व्हावेत अशी प्रार्थना करण्यात येत आहे.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!