राजकीयशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी व बांदा शहरात मोठ्याप्रमाणात राहणाऱ्या परप्रांतीयांची नोंद पोलिस ठाण्यात ठेवा; ‘मनसे’चे डीवायएसपी यांना निवेदन

▪️नवनियुक्त डीवायएसपी डॉ. रोहिणी साळोंखे यांना पुष्पगुच्छ देऊन ‘मनसे’ने दिल्या शुभेच्छा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.०३: तालुक्यात सावंतवाडी आणि बांदा शहरात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय राहतात. याची पोलीस स्थानकात नोंद ठेवण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुक्याच्या वतीने डीवायएसपी डॉ. रोहिणी साळोंखे यांना निवेदन देण्यात आले. तसेच डीवायएसपी डॉ. रोहिणी साळोंखे नवनियुक्त असल्याने पुष्पगुच्छ देऊन त्यांना मनसे कडून शुभेच्छा देण्यात आल्या.

‘मनसे’ने निवेदनात म्हटले आहे की, दोन दिवसांपूर्वी बांदा टोल नाका येथे परप्रांतीय कामगाराचा खून झाला असून यापूर्वी सावंतवाडी तालुक्यात माहे २०११ मध्ये त्या दरम्यान पाच लाखाची हशीश जप्त केली याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी हे परप्रांतीय होते परप्रांतीय हे मोठ्या संख्येने रेल्वेने, बसने याठिकाणी कामानिमित्त येतात हे परप्रांतीय यु.पी. बिहार, केरळ कर्नाटक आदी राज्यातून येत असून सध्या लॉकडाऊन मुळे काही ठिकाणी काम भेटत नाही. आणि भेटले तरी वेळेवर पगार होत नाही. म्हणून काहीतरी विकायचे या उद्देशाने गावागावात फिरतात व आसपासच्या भागाची चौकशी करून दरोडे रात्री घालतात व पैसा वाटप करतेवेळी भांडण करतात व एकमेकांच खून करतात. तसेच काही ठिकाणी भाडोत्री म्हणून राहतात. जे भाडोत्री म्हणून ठेवतात, ते माहिती देत नाहीत. त्या ठिकाणी पोलीस पाटलांना तात्काळ आदेश देऊन त्यांची माहिती गोळा करण्यास सांगावे. त्याचप्रमाणे काही परप्रांतीयांवर दरोडे, खून असे अनेक गुन्हे असून ते फरारी होऊन या ठिकाणी वास्तव्यास राहतात, त्यामुळे या सर्वांची ओळखपत्रे ते जा राज्यातील भागातून आले त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला संपर्क साधून त्यांची माहिती द्यावी व स्थानिक पोलिस स्टेशनला त्यांच्या नोंदी ठेवाव्यात. काहीजण दोषी आढळले तर कठोरात कठोर कारवाई करावी त्याचप्रमाणे सावंतवाडी तालुक्यात अनेक ठिकाणी दारूधंदे, मटका, अनधिकृत गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे. गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात येते. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे तपासणी नाक्यावर वाहनांची कडक तपासणी व्हावी. रात्रीची दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे रात्रीची गस्त वाढविण्याची गरज पोलीस प्रशासनाला आहे.

आज तरुण वर्ग नाहक व्यसनाधीन होण्याची शक्यता आहे. कुटुंबे उध्वस्त होण्याची  शक्यता आहे. म्हणूनच महोदय आपल्या पोलीस स्थानकाच्या अख्यारीत येत असणाऱ्या अनधिकृत दारू धंदे गोवा दारू, मटका, अनधिकृत गुटखा विक्री त्वरित बंद करण्यात यावेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपणास या निवेदनाद्वारे कळवू इच्छितो की, वरील परप्रांतीय अवैद्य धंदे बंद करण्यात यावेत आपल्याला अशा धंद्यांना आळा घालण्यास जी काही मदत सहकार्य हवे असल्यास आमचे महाराष्ट्र सैनिक तयार आहेत. एवढे असूनही तर कारवाई होत नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल. असे मनसेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, शहराध्यक्ष आशिष सुभेदार, माजी जिल्हाउपाध्यक्ष अनिल केसरकर, कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, तालुका सचिव विठ्ठल गावडे, तालुका उपाध्यक्ष सुधीर राऊळ, मनविसे तालुकाध्यक्ष ओंकार कुरतडकर, शुभम सावंत, गौरेश गावडे आदी उपस्थित होते.

*_🔥महाबचत..😍 महाबचत..😍 महाबचत..🔥_*

आता *ऑनलाईन🌎*   पेक्षाही *स्वस्त दरात💰* सर्व *नामांकित💫* कंपन्यांचे *स्मार्टफोन📲* खरेदी करा…! *सावंतवाडीतचं🌴* आणि सोबत मिळावा *नवरात्री🛕* स्पेशल *खास🤩* भेटवस्तू….!🎁😍💃

   *📲 म्युझिक कॉर्नर 🎧*
*🎤 सावंतवाडी 🎼*

_ग्राहकांसाठी_ *नवरात्री💃, दसरा☘️* _आणि_ *दिवाळीच्या🪔* _मुहूर्तावर घेऊन आले आहेत…!_ *स्मार्टफोन📱* _तसेच_ *एलईडी टीव्ही🖥️* _खरेदीवर_ *विशेष🎊* _सूट…! सोबत_  *BAJAJ FINANCE⚡* _आणि_  *SAMSUNG✨ SURE FINANCE* _तेही_  *0%💫* _व्याजदरासह…!_🤩

*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्टफोन:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️iPhone ▪️realme
▪️VIVO ▪️OPPO
▪️ONEPLUS
_तसेच_
*♦️आमच्या येथे Aiwa कंपनीच्या LED TV उपलब्ध:-*
▪️ *24″* एलईडी टीव्ही फक्त *6,500/-*
▪️ *32″* रेग्युलर  फक्त *8,990/-*
▪️ *32″* स्मार्ट फक्त *10,990/-*
▪️ *32″* अँड्रॉइड + स्मार्ट फक्त *11,990/-*
▪️ *40″* स्मार्ट फक्त *14,990/-*
▪️ *43″* स्मार्ट फक्त *18,990/-*
▪️ *50″* स्मार्ट फक्त *24,990/-*
▪️ *55″* स्मार्ट फक्त *29,990/-*
_तसेच_
*👉 सर्व कंपन्यांचे  LED टीव्ही होलसेल दरात व सुलभ हप्त्यामध्ये उपलब्ध…*
*👉 SMART TV Starts from…….Rs.10,990*

*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️Haier   ▪️SONY
▪️Panasonic
_तसेच_
*👉 सर्व प्रकारच्या मोबाईल अँसेसरीजवर 40% पेक्षाही जास्त भरगोस सूट…*

*🏠आमचा पत्ता :* विठ्ठल मंदिर रोड -जयप्रकाश चौक,सावंतवाडी

*📲संपर्क : 7719918722*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!