कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेशासकीय

जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर दाखले प्रांताधिकाऱ्यांकडे प्रलंबित

*🛑 जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर दाखले प्रांताधिकाऱ्यांकडे प्रलंबित*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-१०*:-वेंगुर्ले तालुक्यातील दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लागणारे जात व नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रे २० दिवसांपेक्षा जास्त दिवस होऊनही सावंतवाडीतील प्रांत अधिकारी कार्यालयात प्रलंबित आहे. प्रांताधिकाऱ्यांची सही झाली नसल्याने वेंगुर्ले तालुक्यातून प्रांताधिकाऱ्यांकडे व्हेरिफिकेशनसाठी पाठविण्यात आलेले हे दाखले रखडले आहेत. २० दिवसांच्या आत हे दाखले विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक असताना २० दिवस उलटूनही हे अत्यंत महत्त्वाचे दाखले रखडल्याने पालक व विद्यार्थीवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.विद्यार्थ्यांना हे दाखले वेळेत न मिळाल्यास त्यांच्या शिक्षणाचे वर्ष फुकट जाणार आहे. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी वेळीच हस्तक्षेप करून प्रांताधिकाऱ्यांना समज द्यावी. काही त्रुटी असल्यास त्या वेळीच पालकांना सूचित करणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणासाठी विद्यार्थ्यांचे दाखले प्रलंबित ठेवणे योग्य नाही. त्यामुळे प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया घालवू नये, अशी अपेक्षा पालक व्यक्त करत आहेत.गेल्या २० ते २५ दिवसांपासून सेतू व महा-ई-सेवा केंद्रातून दहावी व बारावी नंतर पुढील शिक्षणासाठी लागणारे नॉन क्रिमिलेयर व जातीचे दाखले मिळण्यासाठी विद्यार्थी पालकांनी सर्व कागदपत्रांनिशी अर्ज केलेले आहेत. मात्र, दाखला मिळण्याची कमाल मुदत संपून गेली तरी विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले प्रांत कार्यालयातच प्रलंबित असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रांताधिकारी कार्यालयातून सद्र दाखले आलेच नसल्याचे कारण सेतू व महा-ई-सेवा केंद्रवाले सांगत आहेत. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वेळेत दाखले मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांना सतत सेतू व महा-ई-सेवा केंद्रात फेऱ्या माराव्या लागत आहेत. यांत त्यांचा वेळ आणि पैसाही वाया जात आहे. त्यामुळे सावंतवाडी प्रांत कार्यालयाच्या कारभाराबाबत वेंगुर्ल्यातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!