कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

अवकाळी पावसातील नुकसान सव्वादोन कोटीचे

*🛑 अवकाळी पावसातील नुकसान सव्वादोन कोटीचे*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०८*:-जिल्ह्यात १६ ते २६ मे २०२४ या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्हयात खासगी व सार्वजानिक मालमतेचे तब्बल २ कोटी २० लाख ५६ हजार ४७० रुपयांचे नुकसान झाले. हा नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे खासगी व सार्वजानिक मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पावसामुळे बागायतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम यासारखी उत्पादन देणारी झाडे वादळी वाऱ्यांमुळे कोलमडून पडली. तसेच ३६० घरांना या वादळ वाऱ्यांचा तडाखा बसला. अनेक गोठे, झोपड्या जमीनदोस्त झाले. दोडामार्ग तालुक्यातील खानयाळे, बोडण, झरे, कोणाळ, कुडासे, साटेली, भेडशी, सावंतवाडीतील इन्सुली, माडखोल, आजगाव, वेंगुल्यातील वायंगणी, कोंडुरा, वडखोल, भेडमळा, दाभोली, होडावडा, अणसूर, परुळे, केळुस, शेळपी, कर्ली, खवणे, वेंगुर्ले बंदर, कुडाळ तालुक्यातील झाराप, साईगाव, सोनवडे, कांडरगाव, मालवणातील कुसरवे, बागवाडी, काळसे, ओवळिये, कणकवली तालुक्यातील कुरंगवणे, पिंपळगाव, संभाजीनगर, शिरवल आदी भागात मोठ्या प्रमाणात घरे, गोठे यांचे नुकसान झाले. यामध्ये दोडामार्गातील ५ लाख ०९ हजार २१० रुपयांचे, सावंतवाडीत ७ लाख १६ हजार २०० रुपयांचे, वेंगुर्त्यात १ लाख ३४ हजार, कुडाळ १ लाख, मालवण ६४ हजार ५०० तर कणकवलीमध्ये ९५ हजार असे एकूण १६ लाख १८ हजार ९१० रुपयांचे नुकसान २३ मे रोजी पडलेल्या वादळी पावसामुळे झाले. तसेच १६ मे रोजी पडलेल्या पावसामुळे कणकवलीत खासगी व सार्वजानिक मालमत्तांचे मिळून ९० लाख ५३ हजार ७८० रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. एकूण ३६० घरांचे नुकसान झाले. तसेच संभाजीनगर येथील चार वीज उपकरणांचे ५० हजार, १८ सार्वजनिक मालमत्तांचे १२ लाख ६० हजार ०५० रुपयांचे, तर इतर मालमत्तांचे ५ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच कणकवली व कुडाळातील पाच जनावरे वीज पडून तसेच पाण्यातून वाहून गेल्याने मयत झाली आहेत. त्यामुळे २ लाख ४५ हजाराचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!