सावंतवाडीत नगर पालिकेने रस्त्यावरील विक्रेत्यांना हटविले
*🛑सावंतवाडीत नगर पालिकेने रस्त्यावरील विक्रेत्यांना हटविले*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०८*:-सावंतवाडीत नगर पालिकेच्या इमारतीपासून मुख्य बाजारपेठेपर्यंतचा रस्त्यावर आंबा, फळे व भाजी विक्रेते बसतात. मात्र, पालिकेने त्यांना ३१ मेपर्यंतची डेडलाईन दिली होती. मात्र, त्यानंतर विक्रेत्यांनी आणखी सात दिवस मुदत मागितली होती. मात्र, ही डेडलाईन संपल्याने रस्त्यावरील विक्रेत्यांची हटाव मोहीम पालिका प्रशासनाने हाती घेतली होती. मात्र, काही आंबा विक्रेत्यांनी २६ जून वटपौर्णिमेपर्यंत आम्हाला मुभा द्या, अशी विनंती केली. वारंवार सांगूनही विक्रेते हटत नसल्याने पालिका प्रशासनाला डोकेदुखी झाली आहे. मुख्याधिकारी सागर साळुंखे म्हणाले, उन्हाळी हंगामात आंबा विक्रीसाठी आम्ही त्यांना मुभा दिली होती. त्यानंतर त्यांनी आणखी पाच दिवस मुदत मागितली होती. आता मुदत संपली आहे. रस्त्याच्या साईडपट्टीने विक्रेते कायमस्वरुपी बसल्यास वाहतूक कोंडी होते. तसेच अपघाताला निमंत्रणही ठरू शकते. रस्त्यावर विक्री करणे योग्य नाही.त्यामुळे हटाव मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे.विक्रेत्यांना बाजारपेठेत जागा निश्चित केली आहे. तेथे त्यांनी विक्री करावी. रस्त्यावर विक्रेते बसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. भाजी व फळे विक्रेत्यांनी पालिका प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. गणेश चतुर्थी तसेच उन्हाळी हंगामात, दिवाळी सणाच्या कालावधीत रस्त्याच्या साईडपट्टीने व्यापार करण्याची मुभा आम्ही देतो. असे असताना या विक्रेत्यांनी आता हट्ट करू नये, असेही ते म्हणाले,सावंतवाडी बाजारपेठेत दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात रस्त्याच्या साईडपट्टीने आंबा बाजार भरतो. यंदा वटपौर्णिमा जूनअखेरीस असल्याने या विक्रेत्यांनी वाढीव मुदतीची मागणी केली. या विक्रेत्यांनी भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब व माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांच्याकडे धाव घेतली होती. त्यांनी या संदर्भात लक्ष घालून पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, पालिका प्रशासनाने या विक्रेत्यांना आम्ही वारंवार कळविल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शुक्रवारी विक्रेत्यांना हटविण्याची मोहीम पालिका प्रशासनाने हाती घेतली होती.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

