कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडी

मडुरा येथे आज वीज ग्राहक संघटना बैठक

*🛑मडुरा येथे आज वीज ग्राहक संघटना बैठक*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओटवणे, दि-०८*:-मडुरा दशक्रोशीतील वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यासह त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेतर्फे शनिवार, ८ जून रोजी सकाळी ११ वाजता मडुरा तिठा येथील हनुमान मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असून वीज वितरणबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. मान्सून पूर्व पावसात विजेचा खेळखंडोबा सुरू असून महावितरणच्या भोंगळ कारभाराचे दर्शन झाले आहे. वीज वितरणच्या अनागोंदी कारभाराला चपराक द्यायची असेल, तर वीज ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी एकत्र येणे आवश्यक आहे, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.बैठकीत वीज ग्राहकांना वारंवार उद्भवणाऱ्या समस्या, कमी दाबाचा वीजपुरवठा, गंजलेले खांब, जुनाट वीज वाहिन्या, गिरणी, दुकानदार, व्यावसायिक, शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान, वाढीव बिले, लवकरच येऊ घातलेले प्रीपेड मीटर आदी समस्यांबाबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. गावातील गंजलेले वीज खांब, जुन्या वाहिन्या आदींबाबत माहिती घेऊन तसा अहवाल महावितरणच्या वरिष्ठांना पाठविण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. वीज ग्राहक संघटनेने यापूर्वी तालुक्यातील बऱ्याच विभागात वीज ग्राहकांच्या बैठका घेतल्या असून त्याला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यातून अनेक समस्या मार्गी लागल्या, रखडलेली विजेची कामे सुरू झाली, काही पूर्णत्वास गेली आहेत. परंतु पावसाळ्यापूर्वी करायची कामे अजूनही प्रलंबित असून ती पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांवर वीज ग्राहकांचा दबाव असणे आवश्यक आहे. यासाठीच या बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीला मडुरा दशक्रोशीतील वीज ग्राहकांनी बैठकीस उपस्थित राहवे, असे आवाहन वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संजय लाड यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!