श्री स्वामी समर्थ मंदिराचा कलशारोहण सोहळ्यानिमित्त ह भ प श्री इंदुरीकर महाराज यांचे हरिकीर्तन
*सावंतवाडी दि.२७-:* युवा उद्योजक तथा भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या चराठे तिलारी कॉलनी येथील निवासस्थान परिसरातील श्री स्वामी समर्थ मंदिराचा कलशारोहण सोहळा उद्या दि.२८ मे रोजी दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने सायंकाळी ठीक सहा ते नऊ त्या वेळेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजाच्या प्रबोधनकार ह भ प श्री इंदुरीकर महाराज यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले आहे. तरी भक्तगणांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन उद्योजक विशाल परब सौ.वेदीका परब, विराज परब, भार्गवी परब यांनी केले आहे.

