आरपीडी प्रशालेचा १० वीचा निकाल १०० %
राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडीचा इयत्ता दहावीचा निकाल १०० % लागला असून तालुक्यामध्ये उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखलेली आहे. राणी पार्वतीदेवी हायस्कूलमधून विशेष नैपुण्य ६७ विद्यार्थी , प्रथम श्रेणी ४१ विद्यार्थी , द्वितीय श्रेणी १६ विद्यार्थी व उत्तीर्ण श्रेणी २ विद्यार्थी असे एकूण १२६ विद्यार्थीपैकी १२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेतून कु.सिद्धी बबन राऊळ हि ९१.८० % ( ४५९ गुण ) मिळवून प्रथम , कु. कुणाल प्रशांत हरमलकर ९१.६० % ( ४५८ गुण ) मिळवून द्वितीय तर कु. पवित्रा हेमंत मसुरकर व कु. वेदा विश्वेश्वर कोळंबेकर ९१.४० % यांनी ( ४५७ गुण ) मिळवून संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकाविला. याचबरोबर , कु. परब आदित्य प्रविण ९१.२० % , कु. कार्लेकर पार्थ राजशेखर ९१ % , कु. धोंड आर्यन जगदिश ९०.६० % ,कु. लोधी अनुष्का जगरामप्रसाद ९०.६० % , कु. सारंग समृद्धी महेंद्र ९०.६० % , कु. परब बाळकृष्ण महेश ९०.२० % असे घवघवीत यश मिळवले आहे. या कामगिरीबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, सर्व मार्गदर्शक शिक्षकवृंद, ,पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष श्री विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर , सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष श्री.अमोल सावंत व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक श्री. जे. व्ही. धोंड उपमुख्याध्यापक श्री. पी. एम. सावंत , पर्यवेक्षक श्रीम. बी.आर.चौकेकर व उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी हार्दिक अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

