कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील धोकादायक वीज खांब बदला !

*🛑सावंतवाडी तालुक्यातील धोकादायक वीज खांब बदला !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओटवणे, दि-२५*:-सावंतवाडी शहरासह ग्रामीण भागात महावितरणच्या विद्युत खांबांची अवस्था बिकट झाली आहे. हे खांब मुळातून गंजल्यामुळे खांब कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. वारंवार महावितरण अधिकाऱ्यांना कल्पना देऊनही याकडे कानाडोळा करत आहे. मोठी दुर्घटना यामुळे घडून जीवितहानीची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वीही अशा घटना शहरात तसेच ग्रामीण भागात घडल्या असून दोन दिवसांत हे जीर्ण विजेचे खांब बदलले न गेल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उबाठा शिवसेनेचे शहरप्रमुख शैलेश गवंडळकर यांनी दिला आहे. शहरातील सालईवाडा मच्छीमार्केट, भवानी चौक बाजारपेठ आदींसह शहरात ठिकठिकाणी आणि ग्रामीण भागात जीर्ण खांब आहेत. महावितरणकडून त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. मुळातूनच हे खांब सडले असून मोठ्या वादळी पावसात ते जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. बाजारपेठ, शाळा, कॉलेजसह रहदारीची ही ठिकाणं आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नमूद करून गवंडळकर यांनी याबाबत महावितरणचे लक्ष वेधले आहे.पावसाळा तोंडावर आला असताना मुळापासून सडलेले हे खांब केव्हाही पडण्याची शक्यता आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगूनही ते पाहणी करत नाहीत. केवळ कर्मचाऱ्यांना आदेश देतात. कर्मचाऱ्यांकडून कोणतेही काम होत नाही. यापूर्वी पाळंदे कुरिअरच्या गवस यांच्यासोबत घडलेली घटना सावंतवाडीकर विसरू शकलेले नाहीत. खांब बदलले नाहीत, तर भविष्यात दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यास जबाबदारी कोण घेणार? दोन दिवसांत यावर उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गवंडळकर यांनी दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!