कणकवलीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

कणकवलीवासियांची ग्लोबल असोसिएट कडून फसवणूक; नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा आरोप

▪️पुन्हा करार करण्याबद्दल अटी-शर्ती बाबत नगरसेवकांनी सूचना करण्याचे नगराध्यक्ष यांचे ऑनलाइन सभेत आवाहन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.०४: ग्लोबल असोसिएट्ससोबतच्या भाजी मार्केट इमारत बांधण्याच्या नगरपंचायत कराराची मुदत संपली आहे. २ वर्षांत ग्लोबल असोसिएट्सने प्रकल्प पूर्ण केला नाही. त्यामुळे पुन्हा करार करण्याबद्दल अटी-शर्ती बाबत नगरसेवकांनी सूचना करण्याचे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले. ग्लोबल असोसिएट्सने भाजी मार्केट इमारत बांधताना कणकवलीवासियांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. भाजी मार्केट बाबत विकासक ग्लोबल असोसिएट्सला पुन्हा परवानगी देताना नागरिकांचे हित पाहूनच करार करण्याचे संकेत नगराध्यक्ष नलावडे यांनी दिले. कणकवली नगरपंचायतची ऑनलाइन सभा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीला प्रभारी मुख्याधिकारी वैभव साबळे, सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक ऑनलाइन सभेत सहभागी झाले होते.या सभेत नगरपंचायतच्या आरक्षित जागेवरील भाजी मार्केट इमारतीचा प्रश्न सभेत ऐरणीवर आला. ग्लोबल असोसिइट्सने करारानुसार अटी शर्ती पळून बांधकाम न केल्याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांचा ”मिले सूर मेरा तुम्हारा” असेच चित्र सभेत होते. विरोधी गटनेते सुशांत नाईक यांनी २ वर्षात झालेल्या करारानुसार बांधकाम झाले काय? याची माहिती मागितली. २ वर्ष होऊनही १ वर्ष उलटले तरी ३ वर्षांत ग्लोबल असोसिएट्सने बांधकाम पूर्ण केलेले नाही. बांधकाम मुदतवाढी बाबत पत्रव्यवहार केला नसल्याचे नगराध्यक्ष नलावडे यांनी स्पष्ट केले.

स्वतंत्र प्लॉटही डेव्हलपर्स ग्लोबल असोसिइट्सने दिलेला नाही. सध्या रस्त्याव्यतिरिक्त सामासिक अंतर सोडले नसल्याचेही उघड झाले. बिल्डिंग साईड मार्जिन डेव्हलपर्सने सोडले नसल्याचे नगररचना सहाय्यक मयूर शिंदे यांनी सांगितले. नगरपंचायतला देणाऱ्या ४० टक्के भूखंडाचा स्वतंत्र ७/१२ नगरपंचायतच्या नावे व्हायला हवा. इमारत बांधकामाची जुनी परवानगी असताना डेव्हलपर्सने फायर एनओसी सादर केली आहे; मात्र नवीन बिल्डिंग प्लॅनला मंजुरी नसतानाही अद्याप मंजूर नसलेल्या नवीन प्लॅन नुसार एनओसी ग्लोबल असोसिइट्सने फायर एनओसी जोडल्याचेही आजच्या सभेत उघड झाले.

ग्लोबल असोसिइट्सने नगरपंचायतच्या मालकीच्या भाजी मार्केट आणि खाजगी डेव्हलपर्सच्या मालकीच्या इमारतीचे एकत्रित बेसमेंट बांधकाम केले आहे, अशी माहिती मयूर शिंदे यांनी दिली. बेसमेंटचे काम अवैध असल्याचे नगराध्यक्ष नलावडे यांनी नमूद करतानाच भाजी मार्केटचे बेसमेंट वेगळे असावे, बेसमेंटवरून भाजी मार्केटला देत असलेला पोचमार्गही बेकायदेशीर असून स्वतंत्र पोचमार्ग पाहिजे, अशी सूचना नगराध्यक्ष नलावडे यांनी केली.

नगरसेवक कन्हैया पारकर यांनी भाजी मार्केट इमारत सुधारित प्रस्ताव सादर करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. ग्लोबल असोसिइट्सच्या कामाबाबत कणकवली नगररचना सहाय्यक मयूर शिंदे नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांची दिशाभूल करत आहेत. डेव्हलपर ला नगररचना सहाय्यक शिंदे पाठीशी घालत असल्याचा आरोप नगरसेवक कन्हैया पारकर यांनी केला.

नगरपंचायतने भाजी मार्केटचे सर्व आरक्षण आपल्या ताब्यात घ्यावे. खासदार आमदार यांच्या निधीतून भाजी मार्केट डेव्हलप करावे, अशी सूचना नगरसेवक पारकर यांनी केली. उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी भाजी मार्केट लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. याबाबत भाजीविक्रेते आणि जनतेचे हित पाहून निर्णय घेण्याचे आवाहन उपनगराध्यक्ष हर्णे यांनी केले.

भाजी मार्केट नगरपंचायतने डेव्हलप करावे अथवा कसे याबाबतचा अधिकार आताच्या घडीला पूर्णपणे नगरपंचायत ला असल्याचे नगरसेवक पारकर यांनी सांगितले. पूर्ण आरक्षित जागा ताब्यात घ्यावी, भूसंपादनासाठी लागणारा निधी राज्य शासनाकडून मिळवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन नगरसेवक पारकर यांनी केले. मुख्याधिकारी साबळे यांनी भाजी मार्केट स्वतः डेव्हलप करण्यासाठी सध्या कणकवली नगरपंचायत आर्थिक सक्षम नसल्याचे नमूद केले.

नगरपंचायतचे वार्षिक ७० लाखाचे उत्पन्न आहे. भाजी मार्केट भूसंपादनाला लागणारा निधी शासनाकडून मिळणे तूर्तास शक्य नाहीय. आर्थिक बाब लक्षात घेता एआरपी च्या माध्यमातून कणकवलीवासीयांच्या हितासाठी डेव्हलपर्स ग्लोबल असोसिइट्सला सुधारित अटी शर्तीसह बांधकाम परवानगी देण्याची सूचना प्रभारी मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी केली. याबाबत अंतिम निर्णय सभागृहाने घ्यावा असेही सीईओ साबळे यांनी सांगितले.

मुख्याधिकाऱ्यांच्या सुचनेनंतर भाजी मार्केटच्या इमारतीकडे जाण्यासाठी मार्ग आहे का ? अशी विचारणा नगराध्यक्ष नलावडे यांनी नगररचना सहाय्यकांकडे केली. ग्लोबल असोसिइट्स ने जुन्या परवानगी नुसार रस्ता दिला नसल्याचे नगररचना सहाय्यक मयूर शिंदे यांनी नमूद केले. यावर प्रत्यक्ष इमारतीची सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी एडिटीपी यांच्या उपस्थितीत करण्याची सूचना सीईओ साबळे यांनी केली.आजच्या मीटिंगमध्ये ठरल्यानुसार भाजी मार्केट बाबत प्रत्यक्ष साईट व्हिजिट केल्यानंतरच पुन्हा करार करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे नगराध्यक्ष नलावडे यांनी स्पष्ट केले.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!