पोलिसाला मारहाण, जातीवाचक शिवीगाळ

*🛑पोलिसाला मारहाण, जातीवाचक शिवीगाळ*

*🛑तिथवली येथील चौघांविरोधात गुन्हा दाखल : नानिवडे फाट्याजवळ घडली घटना*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वैभववाडी, दि-०१*:-कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण झाल्याची घटना वैभववाडीमध्ये घडली. याप्रकरणी वैभववाडी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वैभववाडी पोलीस ठाण्याचे हवालदार शैलेंद्र दिनकर कांबळे यांनी संबंधितांविरोधात जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी तिथवली येथील संशयित संतोष रामचंद्र हरयाण, आत्माराम रामचंद्र हरयाण, प्रकाश हरयाण, दिलीप हरयाण या चौघांवर अॅट्रॉसिटी अॅक्ट व सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नानीवडे फाट्याजवळ घडली. चौघांपैकी तीन संशयित आरोपींना अटक करून त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे. एक संशयित आरोपी अद्यापही पसार आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी संशयित आरोपी संतोष हरयाण यांनी ११२ नंबर कंट्रोल रुमला फोन करून गावात दारू विक्री सुरू असल्याची तक्रार पोलिसांत दिली. याची दखल घेऊन वैभववाडी पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांनी भुईबावडा बीट अंमलदार शैलेंद्र कांबळे व पोलीस कॉन्स्टेबल कोलते या दोघांना पोलीस गाडी घेऊन तिथवलीला पाठवले.पोलीस नानिवडे फाट्याजवळ गेल्यावर त्याठिकाणी गाडी थांबवून चौकशी केली. त्या ठिकाणी संशयित संतोष हरयाण व इतर तिघेजण होते. कांबळे यांना बघताच संतोष हरयाण यांनी एकेरी भाषेत ‘तू कशाला आलास?’, असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत त्यांना चौघांनी मारहाण केली. पोलीस कोलते यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते चौघेजण असल्यामुळे सोडवू शकले नाहीत. त्यांनी कांबळे यांना जबर मारहाण केली. तिथवली येथील श्री गांगेश्वर मंदिर देवस्थानातील मानापनावरून दोन गटात वाद आहेत. याचा तपास बीट अंमलदार कांबळे यांच्याकडे होता. याप्रकारणी हरयाण याला नोटीस देण्यात आली होती. त्याचा राग मनात ठेऊन कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गंभीर दाखल घेत संशयित आरोपींना अटक करून अॅट्रॉसिटी अॅक्ट व सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली हे करीत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!