मुंबई-गोवा महामार्गावर वाहन चालवताना सुरक्षिततेचे नियमांचे पालन करण्या बाबतचे लावण्यात आले फलक,
प्रतिनिधी – सुनील आचरेकर
कसाल – अप्पर पोलीस महासंचालक मुंबई ( वाहतूक) महाराष्ट्र राज्यमार्ग मुंबईचे श्री भूषणकुमार उपाध्याय, पोलीस अधीक्षक मुख्यालय (वाहतूक) श्रीमती सुनीता साळुंके -ठाकरे, पोलीस अधीक्षक रायगड परिक्षेत्र संजय बारकुंड, यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील हायवे महामार्गांवर वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, गाडी चालवताना शिस्तीचे पालन करणे ,मध्यपान करू नये ,याकरिता जनजागृती करून महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी गाडी चालवत असताना अपघाताचे प्रमाण कसे कमी होईल. वाहन चालकांंकरीता सुरक्षितते बाबतची माहिती फलकांचे बॅनर लावण्यात आले असल्याचे माहिती अरुण जाधव यांनी दिली.
मुंबई-गोवा महामार्गावर सर्वच वाहनचालकांनी अतिवेगाने गाडी चालवू नये तसेच बस ,व ट्रक, कारचालक. जड,अवजड वाहने,यांनी डाव्या बाजूच्या लेणचाच (रस्त्याचा) वापर करणे, सिट बेल्टचा वापर करणे, यामुळे अपघाताचे प्रमाणही कमी होईल व महामार्गावर वाहन चालकांना शिस्तीचे पालन होईल याकरिता प्रबोधन करून महामार्गावर दोन्ही बाजूंच्या दिशेने सुरक्षितता माहिती दर्शकचे फलक लावण्यात आले असल्या बाबतची माहिती वाहतूक महामार्ग पोलीस कसाल मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांनी दिली.