आंबा फळ पिक विम्याची उर्वरित रक्कम न मिळाल्यास नेमळेतील आंबा उत्पादक शेतकरी मतदानावर बहिष्कार टाकणार
*🛑 आंबा फळ पिक विम्याची उर्वरित रक्कम न मिळाल्यास नेमळेतील आंबा उत्पादक शेतकरी मतदानावर बहिष्कार टाकणार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२७*:-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच आंबा, काजू बागायतदार याना 2021/22 मध्ये लहरी हवामानाचा फटका बसला होता त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नात लक्षणीय अशी घट झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. नुकसान झालेल्या जिल्ह्यातील बागायतदारांना कमी अधिक प्रमाणात विमा योजनेची रक्कम प्राप्त झाली . मात्र नेमळे परिसरातील आंबा काजू बागायतदार याला अपवाद ठरले आहेत.
नेमळेतील बागायतदारांना अस्मानी संकटासोबत राज्यकर्त्यांच्या रोषालाही बळी पडावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र स्पष्टपणे समोर दिसत आहे. खरे तर विकास कामे करताना, निधी देताना अथवा शासकीय अनुदान व लाभार्थ्यांची निवड करताना पक्षीय राजकारण बाजूला ठेवणे गरजेचे असते. मात्र राजकर्ते तसे करताना दिसत नाहीत. त्याचा फटका नेमळे परिसरातील बागायतदारांना बसताना दिसत आहे. नेमळेतील शेतकऱ्यांना शासकीय यंत्रणा आणि विमा कंपनीने वाऱ्यावर सोडले आहे. विमा हप्ता भरलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना 2021/22 मधील विमा रक्कम मिळाली पाहिजे. त्यासाठी महसूल विभाग, तालुका कृषी, विभागीय कृषी, जिल्हा कृषी, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, पालकमंत्री, आयुक्त, शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री या सर्व लोकप्रतिनिधीना निवेदनाद्वारे पाठ पुरावा करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. २६ जानेवारी २०२३ रोजी दिवसभर उपोषणाला बसूनही एकाही लोकप्रतिनिधीने उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधला नव्हता. त्यावेळी आचारसंहितेचा बडगा पुढे करत वेळ मारुन नेण्याचे काम लोकप्रतिनिधींनी केले होते. मात्र त्यावेळी त्यानी आपला एखादा प्रतिनिधी पाठवत उपोषणकर्त्या बागायतदारांशी संवाद साधणे गरजेचे होते. हवामानावर आधारित फळपिक विमा योजना, फळपिक हे
पर्यावरणीय वातावरणावर अवलंबून असल्याने अवकाळी पाऊस, तसेच कमी जास्त तापमानाचा फटका आंबा, काजूसारख्या फळांना बसतो. लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रधानमंत्री फळपिक विमा योजनेत या फळांचा समावेश करण्यात आला आहे. गतवर्षी फळपिक विमा योजनेत २८५०४ आंबा व काजू बागायतदार शेतकरी सहभागी झाले होते. नुकसान भरपाई पोटी ७४ कोटी २९ लाख रुपये विमा कंपनी कडून देण्यात आले. मात्र इतर गाव तालुके वगळता सावंतवाडी तालुक्यातील नेमळे गावातील शेतकऱ्यांना आंबाफळ, पिकविमा कंपनीकडून हेक्टरी ३८ हजार ४००रु एवढी तुटपुंजी नुकसानी देऊन शेतकऱ्यांच्या तोडाला पाने पुसण्याचे काम करण्यात आले.तापमान वाढीमुळे झालेली नुकसान भरपाई अद्याप दिली नसल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे. सन २०१८ मध्ये निरवडे मंडळाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र निरवडे मंडळामध्ये कुठच्याही प्रकारची हवामानाची नोंद घेणारी स्वयंचलित यंत्रणा बसविलेली नसल्याने २०१८ पासून २०२१ पर्यंत सावंतवाडी महसूल मंडळाचा डाटा वापरून विमा नुकसानी देण्यात येत होती. मात्र २०२२ मध्ये आंबोली महसूल मंडळाचा डाटा वापरून तुटपुंजी विमा नुकसानी देण्यात आली. अशा प्रकारची नुकसान भरपाई देऊन नेमळेतील शेतकऱ्यांची शासन तसेच विमा कंपनी कडून जाणीवपूर्वक फसवणूक करण्यात आली आहे. सावंतवाडी महसूल मंडळ नेमळे गावापासून १० कि. मी. अंतरावर आहे तर आंबोली महसूल मंडळ नेमळे गावापासून ४५ कि. मी. अंतरावर आहे गावालागतच्या मंडळाचा डाटा वापरून नुकसानी देण्याऐवजीं गावापासून दूर असलेल्या महसूल मंडळाचा डाटा वापरून शेतकऱ्यांना नुकसांनी देऊन नेमळेतील शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक फसवणूक करण्यात आली आहे . जिल्ह्याचे एक दोन नव्हे तर तीन मंत्री असताना एकाचाही उपयोग शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी झालेला दिसून येत नाही , हे आमचे दुर्दैव आहे असे म्हणण्याची वेळ नेमळेतील शेतकऱ्यांवर आली आहे. आता पुढे येणाऱ्या निवडणूकांमध्ये मते मागायला येणाऱ्या लोकप्रतिनिधी नेत्यांना याचा जाब विचारला जाणार तसेच उर्वरित 2021/22 मधील आंबा फळ पिकाची नुकसान भरपाई न मिळाल्यास नेमळेतील आंबा उत्पादक शेतकरी येणाऱ्या निवडणुकावर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

