राजापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींमधील ३९९ जागांसाठी ७८३ उमेदवारी अर्ज दाखल..
▪️दाखल उमेदवारी अर्जांपैकी ७४७ अर्ज वैध ठरले तर ९ अर्ज अवैध..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर
🎴राजापूर,दि.३१: पंचवार्षिक निवडणूका होत असलेल्या राजापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींमधील ३९९ जागांसाठी ७८३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. गुरूवारी या अर्जांची छाननी करण्यात आली. त्यामध्ये ७४७ अर्ज वैध ठरले असून ९ अर्ज अवैध ठरले आहेत.
राजापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूका १५ जानेवारी रोजी होत आहेत. ५१ ग्रामपंचायतींच्या १५६ प्रभागातील ३९९ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी दि. २३ पासून ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या मुदतीत ५१ ग्रामपंचायतींमधून ७८३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
या अर्जांची छाननी प्रक्रिया आज गुरूवारी पार पडली. यामध्ये ९ अर्ज अवैध ठरले आहेत. दरम्यान उन्हाळे, फुफेरे, वाल्ये, शिवणेखुर्द, पांगरी खुर्द, परटवली, पडवे, निवेली, कारवली या ग्रामपंचायतीमध्ये जेवढ्या जागा तेवढेच अर्ज आल्याने या ग्रामपंचायती बिनविरोध होणार आहेत.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_