राजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी मतदारसंघात अकराही ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीचीच सत्ता येईल; शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ

▪️आरोंदा येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांचा बबन नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.२९: खासदार विनायक राऊत आणि माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी मतदारसंघात झालेली कामे लक्षात घेता, अकराही ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीचीच सत्ता येईल, असा विश्वास सावंतवाडी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे व्यक्त केला. आरोंदा येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बबन नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत श्री. राऊळ यांनी केले. यावेळी ते बोलत होते. आरोंदा येथील बबन नाईक यांच्या पुढाकाराने विभाग प्रमुख आबा केसरकर, विद्याधर नाईक, सुधा नाईक, आनंद नाईक, मैथिली नाईक यांच्या उपस्थित सुभाष नाईक, स्मिताली नाईक, शंकर नाईक, आनंद नाईक, शिल्पा नाईक, सिद्धेश नाईक, संतोष कुबल, पुनम कुबल आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी बोलताना तालुकाप्रमुख राऊळ म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी करण्यात आले आहे.अरोंदा येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना शिवसेनेमध्ये योग्य मानसन्मान दिला जाईल येणाऱ्या काळात खासदार विनायक राऊत आमदार दीपक केसरकर जिल्हा अध्यक्ष सतीश सावंत यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये विविध ठिकाणी पक्ष प्रवेश घेण्यात येणार आहे. आज विकास आघाडीकडून आमदार दीपक केसरकर तसेच खासदार विनायक राऊत यांनी केलेली विकास कामे लक्षात घेता जनतेची पसंती ही महा विकास आघाडीला आहे त्यामुळे ११ ही ग्रामपंचायतीमध्ये महा विकासआघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन करण्यात येणार आहे.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!