एका रात्रीत चार पक्ष बदलणाऱ्या राजन तेलींना स्वाभिमान शोभत नाही; शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ
▪️खा.राणेंवरील तेलींचे नौटंकीबाद बेगडी प्रेम सर्वश्रुत असल्याची राऊळ यांची टीका..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.१५: एका रात्रीत चार पक्ष बदलणाऱ्या राजन तेली यांना स्वाभिमान शोभत नाही. त्यांनी खासदार नारायण राणे यांना धृतराष्ट्राची उपमा दिली होती ते विसरले असतील पण जनता विसरली नाही तसेच सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी खासदार राणे यांची जंत्री शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या घरी शिवसेनेच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर वाचली. त्यामुळे त्यांचे राणे यांच्यावरील बेगडी प्रेम सर्वश्रुत आहे. ते नौटंकीबाद असल्याची टीका शिवसेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि नगराध्यक्ष संजू परब यांनी शिवसेना दहशत पसरवत असल्याची टीका केली त्याचा आयोजित पत्रकार परिषदेत तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांनी समाचार घेतला. यावेळी शहर प्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, उपतालुकाप्रमुख राघोजी सावंत, महिला संघटक अपर्णा कोठावळे, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, शब्बीर मणियार, संजय पेडणेकर, गजानन नाटेकर, विनायक सावंत आदी उपस्थित होते
राजन तेली आणि संजू परब यांची शिवसेनेवरील टीका म्हणजे उलट्या बोंबा असल्याचे राऊळ यांनी सांगत आतापर्यंत भाजपाने दहशत निर्माण केली नाही परंतु राणे समर्थक यांनी जिल्ह्यात दहशत निर्माण केल्याची जनतेला कल्पना आहे त्यामुळे जनतेने मतपेटीतून त्यांना हिसका दाखवला आहे. राजन तेली यांनी एका रात्रीत चार पक्ष बदलले. त्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे. खासदार राणे यांना धृतराष्ट्र म्हणून उपमा दिली. ते राजन तेली यांनी राणे कुटुंबीयांची तळी उचलत आहे, हे नौटंकी बात आहे त्यामुळे भाजपची दयनीय अवस्था झाल्याचे रूपेश राऊळ म्हणाले
शिवसेना आणि भाजपा युती असताना भाजपाची शिस्तप्रिय भूमिका सर्वश्रुत आहे मात्र राणे समर्थकांनी भाजपाचे नाव वापरून शिस्तप्रिय भाजप मोडीत काढली आहे. निलेश राणे यांना भाजपाने पद जाहीर केल्यानंतर हे चित्र बदलले आणि निलेश राणे बेताल वक्तव्य करू लागले आहेत. नगराध्यक्ष परब देखील बेताल वक्तव्य करून नौटंकी बातची भूमिका बजावत आहेत, असे राऊळ म्हणाले.
सावंतवाडी शहर शांत सुसंस्कृत आहेत या शहराच्या यापूर्वीच्या नगराध्यक्षांची भूमिका संजू परब यांच्या सारखी कधीच नव्हती व्यापारी, भाजीविक्रेते यांच्यात कधी वाद निर्माण झाले नव्हते मात्र परब यांनी भांडणे लावण्याचा प्रयत्न केला आहे तसेच चित्र जिल्ह्यात देखील राणे समर्थक भांडणे वाढवण्यात करत आहेत. भाजपाचा घरातील प्रश्न राजन तेली यांनी घरातच सोडवावा, त्यांनी शिवसेनेबद्दल बोलू नये त्यांनी स्वाभिमान विकला आहे त्यामुळे शिवसेनेचे वर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही, असे राऊळ यांनी सांगितले.
संजू परब यांच्या दम होता तर त्यांनी गांधी चौकात प्रतिमेचे दहन करणारे आंदोलन कशाला केले नाही ते फक्त पोकळ धमक्या देतात परब यांनी पोकळ धमक्या देण्याचे सोडून शहराचा विकास साधावा असे आवाहन त्यांनी केले. माझ्यावर नेमळे आणि मळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचाबाबत टीका करणारे नगराध्यक्ष परब हे इन्सुली ग्रामपंचायतीत निरीक्षक होते. पंचायत समिती सभापती देखील गावचे होते. मात्र त्यांच्या हातून सरपंच पद गेल्याने त्यांच्या मर्मावर बोट ठेवल्याच्या रागाने ते माझ्यावर टीका करत आहे. त्यांनी टीका करण्यापूर्वी आपल्या बुडाखाली काय जळते आहे त्याची खात्री करावी असे राऊळ यांनी केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आचरणात आणून शिवसेना जनतेच्या हितासाठी भल्याभल्यांना अंगावर घ्यायला तयार आहे. मात्र जनतेत दहशत आणि भीती निर्माण करणे हे आमचे ध्येय नाही हे संजू परब यांनी जाणावे. परब दहशत आणि भीती निर्माण करण्यासाठी मनाला वाटेल ते बोलत आहेत असे राऊळ म्हणाले. राजन तेली आणि नगराध्यक्ष परब हे खासदार राणे यांचे नाव वापरून नौटंकी करत आहेत, असे ते म्हणाले.
नगराध्यक्ष निवडणुक पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मुद्यावर संजू परब खासदार विनायक राऊत यांच्या तळेगाव येथील घरी गेले होते तेथे त्यांच्या पायावर घालून घेऊन खासदार राणे कुटुंबाची जंत्री वाचली त्यावेळी मी तेथे उपस्थित होतो. राणे यांच्या बद्दल संजू परब काय काय बोलले याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे त्यामुळे राणे यांच्यावरील बेगडी प्रेम परब यांनी दाखवू नये. वेळ आल्यास ते खासदार राऊत यांच्यासमोर काय काय बोलले त्याचे मौन सोडण्यास मी तयार आहे त्यांनतर त्यांची पळता भुई थोडी होईल असा इशारा देखील तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिला.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_