सावंतवाडीत ३३० मालमत्ता धारकांना पालिकेच्या नोटिसा
*🛑सावंतवाडीत ३३० मालमत्ता धारकांना पालिकेच्या नोटिसा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२३*:-सावंतवाडी नगरपालिकेने ज्या इमारत धारक व घरमालकांनी अद्यापही घरपट्टी भरली नाही, अशा जवळपास ३३० हून अधिक मालमत्ता धारकांना नोटिसा बजावल्या आहेत. लवकरात लवकर घरपट्टी भरावी. अन्यथा कारवाई केली जाणार आहे. २० नळधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. २३ ते २५ मार्च या कालावधीत नगरपालिकेत घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दिली. सावंतवाडी नगरपरिषदेकडून १ जानेवारी २०२४ पासून मालमत्ता व पाणीपट्टी कर विशेष वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी आपला मालमत्ता कर/पाणीपट्टी वेळेत नगरपरिषद कार्यालयात येऊन भरावी. किंवा वसुली पथक जेव्हा आपल्या घरी येईल, तेव्हा भरणा करावी. तसेच कर भरणा केल्याची पावती संबंधित कर्मचाऱ्याकडून घ्यावी. सदर मोहिमेंतर्गत नागरिकांच्या सोईसाठी नगरपरिषदेचे कार्यालय २३ ते २५ मार्च या सुट्टीच्या कालावधीतही सुरू ठेवण्यात येणार आहे. ज्या मालमत्ताधारकांनी थकित मालमत्ता कर किंवा पाणीपट्टी भरणा केलेली नाही, अशा १९० मालमत्ताधारकांच्या मालमत्तांवर महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १५२ अन्वये जप्ती अधिपत्र बजावून करवसुलीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. नळपट्टी थकित असणाऱ्या २० धारकांचे कनेक्शन “खंडित करण्यात आले आहे. नागरिकांनी कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता व पाणीपट्टी कर ३१ मार्चपूर्वी भरणा करावा, असे आवाहन मुख्याधिकारी साळुंखे यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

