हत्तींच्या कळपाकडून केळी, सुपारी बागायत जमीनदोस्त
*🛑हत्तींच्या कळपाकडून केळी, सुपारी बागायत जमीनदोस्त*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि-२२*:-मोर्ले येथे चार हत्तींच्या कळपाने अक्षरशः शेतीची राखरांगोळी केली आहे. तेथील शेतकऱ्यांचे दोन हजारहून अधिक केळी, २०० हून अधिक सुपारी व ५० हून अधिक माड जमीनदोस्त केले. याशिवाय शेतीच्या पाण्याची पाईपलाईन, कुंपण उद्ध्वस्त केले. यात शेतकरी संतोष मोर्ये, सरस्वती मसुरकर, चंद्रकांत बर्डे व सत्यवान बर्डे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील काही दिवसांपासून टस्कर व पिल्लाच्या एका कळपाचा केर, मोर्ले परिसरात वावर होता. तर टस्कर, मादी हत्ती व दोन पिल्ले अशा चार हत्तींचा • कळप बांबर्डे परिसरात वास्तव्यास होता. टस्कर व पिल्लू अन्नाच्या शोधात भ्रमंती करत हेवाळे गावात पोहोचला. मात्र, तेथे दोन्ही कळपातील टस्कर आमने-सामने आले व एकमेकांना भिडले. चार हत्तींच्या कळपातील टस्कर हा मोठा असल्याने दोन हत्तींच्या कळपांतील टस्कराला त्याने पिटाळून लावले व मोठा टस्करही त्यांच्या मागे धावला. तेव्हापासून त्याचा केर, मोर्ले परिसरातच वावर आहे.*मोर्लेतील दोन हजार केळी जमीनदोस्त* तिलारी खोऱ्यात एकूण सहा हत्तींचा वावर असून त्यापैकी चार हत्तींनी मोर्ले येथील केळी, सुपारी व नारळाच्या बागायती उद्ध्वस्त केल्या आहेत. मोर्ले गावचे उपसरपंच असलेले शेतकरी संतोष मोर्ये यांच्या फळबागायतीत घुसून हत्तींनी सुमारे दोन हजार केळींचा फडशा पाडला. दोनशे सुपारी व ५० माड उद्ध्वस्त केले. शिवाय त्यांनी शेतीसाठी केलेली पाण्याची पाईपलाईन, शेतीसाठी बांधलेले संरक्षक कुंपणही उद्ध्वस्त केले आहे. याखेरीज शेतकरी सरस्वती मसुरकर यांची सुपारींची मोठी झाडे जमीनदोस्त केली. सत्यवान बर्डे व चंद्रकांत बर्डे यांच्या देखील सुपारी व माड उद्ध्वस्त केल्या. यात चारही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोठ्या कष्टाने फुलवलेल्या फळबागायती डोळ्यादेखत नष्ट झाल्याचे पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. वनविभागाने या हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी यावेळी केली.
*वाढीव नुकसान भरपाई द्या !* हत्ती प्रश्नासंदर्भात तिलारी खोऱ्यातील शेतकऱ्यांची वारंवार फसवणूक करण्याचे पाप सरकार करत आहे. शेतकऱ्यांना मुंबईत बोलावून हत्ती हटाव संदर्भात घेतलेली बैठक निष्फळ ठरली आहे. तिलारी खोऱ्यात सध्या सहा हत्तींचा वावर असून शेतकऱ्यांची मोठी हानी सुरू आहे. वनविभागाने शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मोर्ले उपसरपंच संतोष मोर्ये यांनी केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

