कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या इशाऱ्यानंतर राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासन झाले खडबडून जागे
राज्य उत्पादन शुल्काची २५ भरारी पथके सिंधुदुर्गात दाखल
छोटे-मोठे दारू व्यवसायिक हादरले अनेकाना जावे लागले पोलीस कोठडीत
ब्युरो न्यूज – कोकण लाईव्ह ब्रेकिंग
सावंतवाडी – कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलच्या वतीने २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिना दिवशी अवैध धंद्यां विरोधात आंदोलन उभे करण्याचा इशारा देण्यात आला होता.त्या नंतर राज्य उत्पादन शुल्क खाते तसेच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहेत, उत्पादन शुल्काच्या पंचवीस गाड्या,( भरारी पथके )सिंधुदुर्गात तैनात करण्यात आली असून ठीक ठिकाणी धाडी टाकून अवैद्य मद्यसाठा जप्त केला जात असल्याने कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या लढ्याला यश आले आहे.
दिवसाकाठी लाखो रुपयाची गोवा बनावटची दारू सिंधुदुर्गात व महाराष्ट्राच्या इतरत्र जिल्ह्यात पुरवठा करून महाराष्ट् शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवला जात होता मात्र याविरुद्ध कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल ने गेला महिनाभर लढा उभारल्यानंतर जवळपास वेगवेगळ्या कारवाई मध्ये दहा कोटीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली, तर राजरोसपणे दारू वाहतूक करणाऱ्यांना लगाम बसला असून दारू तस्करांना पोलिस कोठडीही मिळण्याची ही पहिली वेळ आहे.
गोव्यातून पुरवठा होणाऱ्या अवैद्य मध्य साठ्याबाबत कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने वेळोवेळी आवाज उठवून प्रशासनाला जागे करण्याचे काम केले २६ जानेवारी प्रजासत्ताक दिवशी यांच्या दिवशी आंदोलन उभे करण्याचा इशाराही दिला या इशाऱ्यानंतर राज्य उत्पादन शुल्क तसेच जिल्हा पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले, राज्य उत्पादन शुल्क विभागाने वेगवेगळ्या ठिकाणी छाप टाकण्यासाठी पंचवीस पथके तयार केली असून छोट्या-मोठ्या दारू व्यवसायावरही कारवाई केली जात आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी केलेल्या कारवाईची माहिती प्रसार माध्यमांना दिली असून राज्यात अवैद्य मुद्दा पुरवठा मोठ्याप्रमाणात होण्याचे गोवा हे एकमेव ठिकाण आहे.त्यामुळे गोव्यातून येणारा अवैद्य मध्ये साठा जप्त करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश कांतीलाल उमाप यांनी दिले आहेत. तर जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी पोलीस प्रशासनाला अवैद्य दारू धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल याबाबत समाधानी आहे ही कारवाई असेच चालू ठेवावे अशी मागणीही कोकण लाईव्ह च्या वतीने राज्य उत्पादन शुल्क व पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.