गुरव समाज जोडो अभियानातून समाज संघटीत करू – अण्णासाहेब शिंदे
आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत समाजाचे ताकद दाखवून देऊ
प्रतिनिधी – किशोर धुरे
वैभववाडी:- गुरव समाजाने सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेञामध्ये नेहमीच मोठे योगदान दिले आहे.परंतु शासनान गुरव समाजावर अन्याय करीत आहे.गुरव समाज जोडो अभियानातून गुरव समाज संघटीत करुन, आगामी काळात होणाऱ्या निवडणूकीत गुरव समाजाची ताकद दाखवून देऊ.असा इशारा अॕड आण्णासाहेब शिंदे यांनी दिला आहे.
शासनाला आमची ताकद दाखवून देऊ.खिल गुरव समाज संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्हा वतीने गुरव जनजागृती अभियानाला वैभववाडी तालुक्यातून सुरुवात करण्यात आली.यावेळी अँड.अणांसाहेब शिंदे यांनी गुरव समाजाची जनगणना व्हावी व गुरव समाजातील मुलांना शैक्षणिक सवलती मिळाव्यात, महिलांना प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत ,यासारख्या विविध मागण्या आपण शासनाकडे करत असल्याचे सांगितले कारण गुरव समाजाने सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक कामांमध्ये नेहमी आपले योगदान दिले आहे.पण आता शासन गुरव समाजवर अन्याय करीत आहे, त्यामुळे आता शासनाला जाग आणण्यासाठी आपण गुरव समाजाची जनगणना सुरू केली आहे.ही जनजागृती करून पुढील काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये गुरव समाजाची ताकद आम्ही दाखवून देऊ व व राजकारण्यांना आमची दखल घेण्यास भाग पाडू असे शिंदे यांनी सांगितले. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातुन गुरव जोडो अभियानांतर्गत गुरव जनगननेला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी वैभववाडी गुरव समाज सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते या प्रसंगी प्रदेश युवा सरचिटणीस रवींद्र निलकंठ,मुख्य सचिव महाराष्ट्र- विलास पाटील गुरव ,प्रदेश सरचिटणीस- मंगेश गुरव, जिल्हाध्यक्ष- संजय सावंत, महिला जिल्हाध्यक्ष -सायली गुरव, जिल्हा युवा अध्यक्ष -सदाशिव(राजू) गुरव, कुडाळ तालुका अध्यक्ष- अभिनव गुरव, कणकवली तालुका अध्यक्ष- चंद्रकांत गुरव, वैभववाडी महिला तालुका अध्यक्ष- सौ साक्षी गुरव, श्री वसंत पोवार गुरव व समस्त गुरव समाज बांधव उपस्थित होते.

