खिडकीतला निसर्ग फोटो’ या राज्यस्तरीय स्पर्धेत वैभववाडीतील कु. मंथन संतोष टक्के प्रथम
खिडकीतला निसर्ग फोटो’ या राज्यस्तरीय स्पर्धेत वैभववाडीतील कु. मंथन संतोष टक्के याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ‘वयम्’ मासिकातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मंथनच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या स्पर्धेत राज्यातील 150 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत स्पर्धकांना घरातून, वस्तीतून, आवारातून, गच्चीतून निसर्गातली जी जी गंमत दिसते, तिचे फोटो काढायचे होते. त्यातला एक फोटो व त्याचं वर्णन करणारी दोन ते चार वाक्य लिहायची होती. तो तुम्ही तुमच्या घरातून किंवा आवारातूनच फोटो काढलायचा अशी या स्पर्धेत अट होती. बाहेर फिरायला गेलो की, निसर्गाचे फोटो काढतो, तसे फोटो या स्पर्धेत अपेक्षित नव्हते.
घरातून दिसणारा निसर्ग या स्पर्धेतून आपल्याला दाखवायचा होता. संपूर्ण राज्यातून मुलांनी विषय समजून घेत स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला. सीमा राजेशिर्के यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. कु. मंथन याच्या छायाचित्राला प्रथम 10 छायाचित्रांमध्ये प्रथम क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. मंथन आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे या प्रशालेत इयत्ता दहावी मध्ये शिकत आहे. त्याच्या उज्वल यशाबद्दल त्याचे कौतुक केले जात आहे.