राजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

बेगडी शिवसैनिकांना नाकाला जीभ लावून युतीच्या तत्वावर बोलण्याचा अधिकारच नाही..

▪️ज्यांचा जन्मच काँग्रेस-राष्ट्रवादी पुढे भिकेची झोळी पसरून झालाय, त्यांना भिकेचा कटोरा सोडून दुसरे दिसणार काय?

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत

🎴सावंतवाडी,दि.२७: ज्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरवातच रडत झाली आहे, अशा रडतराऊतांकडून आमदार नितेश राणे यांचे आव्हान स्वीकारले जाण्याची हिंमत दाखवलीच जाऊ शकत नाही, हे माहीतच होते. आमदार नितेश राणेंनी मांडलेले परखड सत्य मिरचीप्रमाणे झोंबले असल्याने उपऱ्यांनी वडाच्या पारंब्या पिंपळाला लावण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. आयुष्यभर शिवसेनेसाठी रक्त आटवलेल्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी काँग्रेस राष्ट्रवादीतुन आयात आमदारांच्या पालख्या वाहण्याची वेळ आपल्यावर येण्यापेक्षा घरात बसणे पसंत केले. तुमच्याच पातळीवर येऊन बोलायचे झाले तर बाळासाहेबांचे खरे वारसदार हक्कापासून वंचित झाले आणि बायको वांझोटी नसतानाही सरोगसीद्वारे काढलेली हगुरडी पोरे नेते म्हणून कडेवर मारून घ्यायची वेळ पक्षावर आली. मोकळे रान मिळालेले हेच उपरे पुढे स्वतःला शिवसैनिक म्हणवत भाजपावर खालच्या पातळीवर येत टीका करू लागले आहेत. भाई गोवेकरांसारखे बाळासाहेबांचे शिवसैनिक आता दसऱ्याला केल्या जाणाऱ्या शस्त्रपुजनासारखे बाहेर काढले जाऊ लागले आहेत. मातोश्री आणि युती याबाबत भाईंसारख्या खऱ्या शिवसैनिकांनी केलेली टीका भाजपाने कधीही आदरानेच स्वीकारली असती. बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आणि हिंदुत्वाचे मंदिर असलेली ती मातोश्री भाजपाला आजही आदरणीयच आहे, हे कोणीही नाकारलेले नाही.

पण…. ज्यांची राजकीय कारकीर्दच बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या तत्वाची नफरत केली, त्याच तत्वाचे जोडे डोक्यावर घेऊन नाचवत सुरू झाली,  ज्यांनी मातोश्रीची मान-मर्यादा इटलीची मावशी आणि बारामतीच्या काकांच्या पायऱ्यावर नेऊन विकली, बाळासाहेबांच्या जाज्वल्य हिंदुत्वाचे गाठोडे बांधून हाजी अलीच्या समुद्रात बुडवले, अशा उपऱ्या भाडोत्र्यांनी मातोश्रीच्या पूर्वपुण्याईवर आणि युतीतल्या पूर्वसंबंधांवर बोलताना चार वेळा विचार करावा. औकातीबाहेर जाऊन बेडकासारखे पोट फुगवून हसे करून घेऊ नये. आपली यापुढे निवडून येण्याची लायकी नाही हे जसे तुम्हाला समजते, तसेच जनतेलाही समजते. आज जेव्हा तुमच्याच पक्षाची आयुष्यभर भगवा घेऊन मिरवणारी एक महिला जिल्हा परिषद सदस्या तुमची लायकी काढत तुम्हाला जाहीरपणे “सुपारीबाज” म्हणते तेव्हाच खरं तर तुम्ही तुमचे भवितव्य समजून जायला हवे होते. आमदार राजन साळवींचा आहेर शालजोडीतला तरी होता, पण सौ.लक्ष्मी शिवलकर यांनी तर थेट जोड्यानेच हाणलेय तुम्हाला. निवडणूक लढायचे तर सोडाच, आधी राजीनामा देऊन घरी बसणे तुम्ही स्वतःहून पसंत करायला हवे होते. पण वरती ज्या निर्लज्जपणे उपऱ्यांकडून तुम्ही मोदी-शहांवर टीका करवता, तो निर्लज्जपणा येतो कुठून, हा खरा संशोधनाचा विषय आहे.

तत्कालिन युतीचे खासदार विनायक राऊत यांचे पावणेदोन लाखांचे मताधिक्य हा रिफायनरी विरोधाचा पुरावा म्हणून दाखवणे यासारखी दुसरी माकडचेष्टा नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी पक्षाच्या आदेशानुसार रात्रंदिवस तुमच्या विजयासाठी मेहनत घेतली त्याची एहसान-फरामोशी करून आपले खरे स्वरूप त्यातून दाखवुन दिलात. प्रमोद जठारांनी निवडणूक लढवण्याची बात आता करताय, पण तेव्हा जठारांनी नुसते विरोधात मत व्यक्त केल्यानंतर जठारांच्या दारात तुमच्या नेत्यांनी कशी लोटांगणांची जत्रा भरवली होती ते तुमच्या नेत्यांना एकदा विचारून खात्री करून घ्या. आता जनतेनेही म्हणणे आहे, जर हे पावणेदोन लाखाचे मताधिक्य तुमचेच आहे म्हणता, तर दाखवा हिंमत राजीनामा देऊन निवडणूक लढवण्याची! तिथे का मग टरकते आणि बाजारबुणग्यांची फौज घेऊन सबबी देण्याची वेळ येते?

ज्यांना शिवसेनासुद्धा अजून कळली नाही अशांना रिफायनरी प्रकल्प म्हणजे काय हे समजण्याची अपेक्षा करणेच चुकीचे आहे. रिफायनरी समर्थकांनी टीकेच्या मुद्द्यावर आमने-सामने येऊन चर्चा करण्याचे आव्हान खासदारांना कधीच दिलेले आहे. ते स्वीकारण्याची हिंमत आजवर खासदारांनी दाखवलेली नाही. आपल्यावर रिफायनरी संबंधात दलालीची केलेली टीका सिद्ध करून दाखवावी, अन्यथा कणकवलीच्या पटवर्धन चौकात जाहीर माफी मागावी, हे जठारांचे आव्हानसुद्धा खासदार विनायक राऊत यांना अद्यापपर्यंत पेलवलेले नाहीत. आव्हान पेलण्याची हिंमत असलेल्यांना मर्द म्हणतात, असे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे. शिवसेना शब्दाचा आधार घेऊन त्याखालून कोल्हेकुई घालणाऱ्यांनी उगाच वाघाचा आव आणू नये. ज्यावेळी बाळासाहेबांचा पंचप्राण असलेले हिंदुत्व तुम्ही सत्तेसाठी सेक्युलर बुळ्यांच्या पायावर नेऊन वाहिलंत, मराठी अस्मिता मुंबईतल्या बॉम्बस्फोटातल्या आरोपींची रदबदली करणाऱ्यांच्या हवाली करून सत्तेसाठी सौदेबाजी केलात, तळकोकणातल्या कोकणी माणसाची कालच्या लॉकडाऊनमध्ये लांडगेतोड करत परप्रांतीयांसमोर आरत्या ओवळलात, तेव्हाच “बाळासाहेबांचा शिवसैनिक” हे नावही तोंडातून उच्चारण्याची नैतिक पात्रता तुम्ही गमावून बसला आहात. तळकोकणात भगवा तर फडकणारच,होय, रुबाबातच नव्हे तर दिमाखात फडकणार… पण त्या भगव्यावर तुमच्यासारख्या सेक्युलर पिचक्या मनगटांचा काय अधिकार?

कोकणचा विकास करणारे प्रकल्प आणणारे, प्रगतीची स्वप्ने दिमाखात पूर्ण करण्याची क्षमता असणारे, आणि भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान मिळवून देणारे सक्षम हात आणि राष्ट्रवादाने तेजाळलेली भगवी हृदये त्यासाठी सक्षम आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बोळ्याने वांझोटा सेक्युलरवाद पिऊन वाढणाऱ्या नव्या शिव, माफ करा, चिव-सैनिकांनी भगव्या मातीच्या तळकोकणाची चिंता करू नये. विकास, हिंदुत्व, राष्ट्रवाद, पौरुष्य अन भगवा झेंडा… या सगळ्यासाठी कोकणी जनतेने भाजपाचा पर्याय समर्थपणे आणि विश्वासाने निवडलेला आहे, हे येणाऱ्या काळात दिसून येणारच आहे. त्यासाठी ईव्हीएम मशीनच्या भाडोत्री टाहो फोडणाऱ्या रडतराऊत रुदालींची व्यवस्था आतापासूनच करून ठेवा!!

—– अविनाश पराडकर, सिंधुदुर्ग
9422957575

*✝️आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगाव येथे प्रथमच नव्याने सुरू होत आहे.
*🏥जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगाव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी..!
*🛐अँक्यू नेचर क्युअर  पर्वरी-गोवा संचलित*

    *‼️निसर्गोपचार चिकित्सा केंद्र‼️*
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला..

*🌳निसर्ग हाच तुमचा डॉक्टर..!*
*🍓आहार हेच तुमचे औषध..!*

*🔵उपलब्ध सुविधा-*
⏺️योग-नॅचरोपॅथी
⏺️ॲक्युप्रेशर
⏺️आयुर्वेद
⏺️होमिओपॅथी
⏺️पंचगव्या
⏺️आहार सल्ला

*🟢निसर्गोपचार चिकित्सा उपचार-*
🔹सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
🔹मणक्यांचे विकार
🔹शारीरिक / मानसिक विकार
🔹श्वसनाच्या समस्या
🔹पोटांचे आजार
🔹मुत्राशयाचे विकार
🔹लकवा
🔹नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
🔹स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या

*🟣आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार💊💉
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣

*🟣उपचाराची वेळ🩺*
*सकाळी –*🌅 ८.०० ते दुपारी २.००,
*सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००
*🔋टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

*🔮संपर्क-*
*📱९४०३८२७२६१*
*📱८३२९३३१७२०*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!