आधी काश्मीर ताब्यात घेऊ, मग भारतावर हल्ला करू, शोएब अख्तरचं वादग्रस्त विधान..

 

कलंबिस्त मळा येथे शोएब अख्तर च्या प्रतीकात्मक पुतळ्याचे करण्यात आले दहन

कार्यकारी संपादक आनंद धोंड

सावंतवाडी – ‘आधी काश्मीर ताब्यात घेऊ, मग भारतावर हल्ला करू,अशा प्रकारचं वादग्रस्त विधान पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर याने पाकिस्तानच्या “समा” टीव्ही शी बोलताना केले. या गोष्टीचा निषेध म्हणून या पार्श्वभूमीवर आज भाजपा सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष संदेश बिडये यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्ते आणि कलंबिस्त पंचक्रोशीतील हिंदू बांधवांनी एकत्र येत कलंबिस्त मळा येथे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर च्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी उपस्थितांनी “भारत माता की “जय,” वंदे मातरम्” असे नारे दिले.
यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष संदेश बिडये, कलंबिस्त सरपंच शरद नाईक, कृष्णा सावंत, प्रथमेश श सावंत, ग्रा.सदस्य नामदेव पास्ते, अजित राऊळ, निखील सावंत, अनिकेत सावंत आधी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!