आ. नितेश राणे यांचा शिवसेनेला पुन्हा एकदा दे धक्का.

 

लोरे नं. २ येथील कट्टर शिवसैनिक सुरेंद्र रावराणे यांचा भाजपात प्रवेश.

प्रतिनिधी – संजय शेळके

वैभववाडी – भाजपा नेते आमदार नितेश राणे यांचा शिवसेनेला पुन्हा एकदा दे धक्का. वैभववाडी तालुक्यातील लोरे नं. २ येथील कट्टर शिवसैनिक सुरेंद्र वसंत रावराणे यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. सुरेंद्रराव यांच्या पक्ष प्रवेशानंतर त्यांचे वैभववाडी भाजपच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. वैभववाडी तालुक्यात आमदार नितेश राणे यांनी पक्षप्रवेश मालिका सुरू केल्याने शिवसेनेने मोठी धास्ती घेतली आहे. आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत दोन दिवसापूर्वी नेर्ले ग्रामपंचायत सदस्यासह तब्बल ४२ शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला होता. ज्येष्ठ शिवसैनिक असलेले सुरेंद्र रावराणे यांनी शिवसेनेच्या कारभाराला कंटाळून कमळ हाती घेतले आहे. लोरे ग्रामपंचायतची निवडणूक होऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर सुरेंद्र रावराणे यांचा प्रवेश शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. सन १९९० पासून सुरेंद्र रावराणे हे शिवसैनिक म्हणून कार्यरत होते. गावात तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदावर ते कार्यरत आहेत. तसेच देवस्थान समिती अध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत. लोरे गावात त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. त्यांच्या प्रवेशामुळे लोरे गावात भाजप अधिक भक्कम होणार आहे. कणकवली येथे त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, शक्ती केंद्रप्रमुख रितेश सुतार, सोसायटी चेअरमन प्रमोद पांचाळ, छोटू रावराणे, संजय रावराणे आदी उपस्थित होते.
फोटो – कणकवली येथे नितेश राणे यांच्या उपस्थितीत सुरेंद्रराव रावराणे यांचा भाजपात पक्ष प्रवेश. यावेळी उपस्थित समीर नलावडे, रितेश सुतार, प्रमोद पांचाळ, छोटू रावराणे, संजय रावराणे आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!