राजकीयवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

आ. नितेश राणे यांचा शिवसेनेला पुन्हा एकदा दे धक्का..

▪️लोरे नं. २ येथील कट्टर शिवसैनिक सुरेंद्र रावराणे यांचा भाजपात प्रवेश..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.२६: भाजपा नेते आमदार नितेश राणे यांचा शिवसेनेला पुन्हा एकदा दे धक्का. वैभववाडी तालुक्यातील लोरे नं. २ येथील कट्टर शिवसैनिक सुरेंद्र वसंत रावराणे यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. सुरेंद्रराव यांच्या पक्ष प्रवेशानंतर त्यांचे वैभववाडी भाजपच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

वैभववाडी तालुक्यात आमदार नितेश राणे यांनी पक्षप्रवेश मालिका सुरू केल्याने शिवसेनेने मोठी धास्ती घेतली आहे. आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत दोन दिवसापूर्वी नेर्ले ग्रामपंचायत सदस्यासह तब्बल ४२ शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला होता.

ज्येष्ठ शिवसैनिक असलेले सुरेंद्र रावराणे यांनी शिवसेनेच्या कारभाराला कंटाळून कमळ हाती घेतले आहे. लोरे ग्रामपंचायतची निवडणूक होऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर सुरेंद्र रावराणे यांचा प्रवेश शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सन १९९० पासून सुरेंद्र रावराणे हे शिवसैनिक म्हणून कार्यरत होते. गावात तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदावर ते कार्यरत आहेत. तसेच देवस्थान समिती अध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत. लोरे गावात त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. त्यांच्या प्रवेशामुळे लोरे गावात भाजप अधिक भक्कम होणार आहे. कणकवली येथे त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला.

यावेळी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, शक्ती केंद्रप्रमुख रितेश सुतार, सोसायटी चेअरमन प्रमोद पांचाळ, छोटू रावराणे, संजय रावराणे आदी उपस्थित होते.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!