कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

भाताला हेक्टरी २० हजार प्रोत्साहन अनुदान

*🛑भाताला हेक्टरी २० हजार प्रोत्साहन अनुदान*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२८*:-किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप हंगाम सन २०२३-२४ अंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान (भात) उत्पादनाकरिता जमिनीचे धारण क्षेत्रानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी २० हजारप्रमाणे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी शेतकरी नोंदणीकृत क्षेत्रानुसार लाभ देण्यात येणार असून यासाठी भात विक्री केलेली असली अथवा नसली तरीही लाभ देण्यात येणार आहे.यासाठी भात विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या क्षेत्रानुसार लाभ त्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात येणार आहे. ही अतिरिक्त प्रोत्साहन राशी केवळ पणन हंगाम २०२३-२४ धान पिकविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लागू आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी पेरणी केलेल्या क्षेत्राची ई-पीक पाहणीद्वारे खातरजमा करून जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे. धान उत्पादन शेतकरी हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ या दोन अभिकर्ता संस्थेकडून सुरू केलेल्या कोणत्याही खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असला पाहिजे. प्रोत्साहनपर राशीस पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे धान अभिकर्ता संस्थाना विक्री करणे बंधनकारक नाही. सातबारा उताऱ्यावरील धान लागवडीखालील जमिनीच्या क्षेत्रफळानुसार ही रक्कम निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी राज्याकरिता एकूण १६०० कोटी रुपये अतिरिक्त खर्चासही मान्यता देण्यात आली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!