कणकवलीकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

जात प्रमाणपत्रे नव्याने देण्यात यावीत.. आरक्षित समाज अध्यक्ष – सुजित जाधव

याबाबत आरक्षित समाज आणि वैश्यवाणी बांधवांच्या वतीने प्रांताधिकार्‍यांना देण्यात आले निवेदन

प्रतिनिधी – रविकांत जाधव

कणकवली:२४ – इतर मागास प्रवर्गातील वैश्य वाणी, वाणी या जातीच्या दाखल्यावर चुकीचे संदर्भ देत शासन निर्णय नमूद करण्यात आल्याने सदर जात प्रमाणपत्रे अवैध ठरण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे याबाबत योग्य त्या शासन निर्णय याचा संदर्भ घेत ही जात प्रमाणपत्रे नव्याने देण्यात यावीत अशी मागणी आरक्षित समाज अध्यक्ष सुजित जाधव यांच्यासह वैश्यवाणी बांधवांच्या वतीने कणकवली प्रांत अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, काही वाणी ( 190 ) इतर मागासवर्ग या जात प्रमाणपत्रांवर शासन निर्णय क्र . ‘ CBC – 10 / 2014 / C.R.9 / MVK ‘ असा चुकीचा नमूद असून सदर शासन निर्णयाचा दिनांक 04/09/2014 ‘ हा देखील चुकीचा नमूद आहे. सदर शासन निर्णय क्र . CIRC – 10 / 2014 / CC.R.9 / MVK चा दिनांक 01/03/2014 ‘ असा असून सदर शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य शासनाच्या इतर मागासवर्गाच्या जातीच्या यादीमध्ये अ . क्र . 190 वरील ‘ क पार . काथार वाणी ‘ या मूळ जातीसमोर वैश्यवाणी , वैश्य – वाणी , वै वाणी , वैश्य वाणी , v.Wani , पानारी ‘ या तत्सम जातींचा समावेश नव्याने करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयान्वये ‘ वाणी ‘ या जातीचा समावेश महाराष्ट्र राज्य शासनाच्या इतर मागासवर्गाच्या जातीच्या यादीमध्य अ . क्र . 190 वर करण्यात आलेला नाही. तसेच दिनांक 04/09/2014 च्या शासन निर्णयाचा क्र . ” CBC – 10 / 2014 / C.R.88 / MVK ‘ असा असून सदर शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य शासनाच्या इतर मागासवर्गाच्या जातीच्या यादीमध्य अ . क्र . 190 वरील वाणी , तांबोळी ‘ या मूळ जातीसमोर लिंगायत वाणी लिंगायत तांबोळी ‘ या तत्सम जातीचा समावेश नव्याने करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयान्वये देखील ‘ वाणी ‘ या जातीचा समावेश महाराष्ट्र राज्य शासनाच्या इतर मागासवर्गाच्या जातीच्या यादीमध्ये अ . क्र . 190 वर करण्यात आलेला नाही . सबब काही ‘ वाणी ( 190 ) इतर मागासवर्ग ‘ या जात प्रमाणपत्रांवर चुकीचा नमूद असलेला शासन निर्णय CBC – 10 / 2014 / C.R.9 / MVK व त्या शासन निर्णयाचा दिनांक 04/09/2014 ‘ हा देखील चुकीचा नमूद असल्याने सदर जातप्रमाणपत्र ही योग्य त्या शासन निर्णयान्वये निर्गमीत केली असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे सदर तीनही जात प्रमाणपत्रांची वैधता देखील निश्चित करता येत नाही. वास्तविकपणे , शासन निर्णय क्र . सीबीसी 10 / 2008 / प्र.क्र .235 / मावक -5 , दि . 25 जून 2008 या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य शासनाच्या इतर मागासवर्गाच्या जातीच्या यादीमध्ये अ . क्र . 190 वरील ‘ काथार , काथार वाणी , कंठहार वाणी, वैश्यवाणी , कुलवंत वाणी , नेवी ‘ या मूळ जातीसमोर ‘ धाकड , मिटकरी वाणी , वारळ , बोराळ , बारूळ . वोरड , तांबोळी ‘ या तत्सम जातीचा समावेश आलेला आहे , सबब सदर शासन निर्णयान्वये वाणी ( 190 ) – इतर मागावर्ग ‘ या जातो प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र निर्गमीत करणे योग्य ठरणार आहे .
सबब ‘ वाणी ( 190 ) – इतर मागासवर्ग ‘ या जातीप्रवर्गाची चुकीचा शासन निर्णय व त्याचा दिनांक नमूद असलेली जात प्रमाणपत्रे योग्य तो शासन निर्णय व त्याचा योग्य ता दिनांक नमूद करून सुधारीत करून निर्गमीत करणेत यावीत , ही नम्र विनंती आहे . अन्यथा जात प्रमाणपत्र व त्याच्या वैधते अभावी भविष्यात जनतेच्या होणा – या कोणत्याही स्वरूपाच्या नुकसानीची जबाबदारी प्रशासनाची असेल याची नोंद घ्यावी . यावेळी वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष दादा कुडतरकर, नगरसेवक कन्हैया पारकर, अण्णा कोदे, महेश कोदे, राजन पारकर, लवु पिळणकर आदी उपस्थित होते.​​

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!