▪️अण्णा नाईक परत येणार असे लाल रंगाने हायवे पुलावरून रंगरंगोटी
▪️कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल शिरसाठ यांचा रात्रीस खेळ चाले टिमला दणका
*🖥️Kokan Live Breaking News*
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : अण्णा नाईक परत येणार असे लाल रंगाने हायवे पुलावरून रंगरंगोटी करणाऱ्या प्रोडक्शन टीमला कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल शिरसाठ यांनी दिलेल्या दणक्यानंतर सगळी रंगरंगोटी पुसुन टाकण्यात आली.
रात्रीस खेळ चाले फेम मालिकेतील अत्यंत गाजलेले पात्र म्हणजे अण्णा नाईक. हेच अण्णा नाईक परत येणार असा मजकुर नॅशनल हायवेच्या पुलावर ठिकठिकाणी रंगवण्यात आला आहे. याबाबत संबंधित हायवे औथोरिटीकडे परवानगी घेतली आहे का? अशी विचारणा कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते विशाल शिरसाठ यांनी केली. त्यावेळी कोणतीही परवानगी नसल्याचे विशाल यांना समजले. तात्काळ विशाल शिरसाट यांनी संबंधित मालिकेच्या प्रोडक्शन टीमशी संपर्क साधुन पब्लिसिटीच्या नावाखाली केलेली रंगरंगोटी हटवा. अन्यथा सिंधुदुर्गात तुमचं शुटिंग सेट लागु देणार नाही, असा इशारा दिला. शिरसाट यांच्या इशाऱ्यानंतर लागलीच हायवे वरील बॉक्सेलच्या भिंतींवर केलेली रंगरंगोटी पुसण्यात आली आहे.
_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
*🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_
_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_
_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

