वारकरी संप्रदायाचा संतसेवा पुरस्कार जाहीर
२७ डिसेंबर २०२० रोजी होणाऱ्या जिल्हा वारकरी मेळाव्यात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रधान करण्यात येणार पुरस्कार.
प्रतिनिधी – सुनील आचरेकर
कणकवली :- सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत दरवर्षी देण्यात येणारा मानाचा संतसेवा पुरस्कार आज जाहीर करण्यात आला. हे पुरस्कार वैभववाडी येथिल गेली ४० वर्षे वारकरी भजन करणारे व प्रसिद्ध कीर्तनकार मा.ह.भ.प.हरिश्चंद्र दत्तू फ़ोडके हेते व वैभववाडी येथील गेली २० वर्षे कीर्तन व प्रवचन करणारे व गेली १२ वर्षे कोकण दिंडी चे अध्यक्ष राहिलेले कीर्तनकार मा.ह.भ.प.बाळकृष्ण तुकाराम जाधव ( भोम) यांना जाहीर करण्यात आले.
आज झालेल्या जिल्हा वारकरी संप्रदाय च्या पुरस्कार निवड समितीने हे पुरस्कार जाहीर केले.यावेळी जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर, उपाध्यक्ष श्री हरिश्चंद्र पारधीये,मधुकरराव प्रभुगावकार, सचिव श्री.राजू राणे उपस्थित होते.
हे पुरस्कार गेलीं ९ वर्षे देण्यात येत असून दिनांक २७ डिसेंबर २०२० रोजी होणाऱ्या जिल्हा वारकरी मेळाव्यात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रधान करण्यात येणार आहेत.

