पिंगुळी येथील २७ वर्षीय तरुणाचे आकस्मिक निधन
कुडाळ, दि. २३ : कुडाळ तालुक्यात पिंगुळी येथील २७ वर्षीय तरुण विशाल दत्ताराम (सुंदर) मेस्त्री यांचे आज सायंकाळी आकस्मिक निधन झाले. लक्ष्मीनारायण विद्यालयाच्या बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुंदर मेस्त्री यांना पुत्रशोक झाला. विशाल यांच्या पश्चात आई,वडील, दोन भाऊ तसेच काका, काकी, चुलत भावंडे असा परीवार आहे.
