कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥पालकमंत्री चव्हाण आज-उद्या सिंधुदुर्गात

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.१५:- सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे १५ व १६ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. १५ रोजी सकाळी ६.४० वाजता कणकवली रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, कणकवलीकडे प्रयाण व राखीव. सकाळी ९ वाजता कणकवली येथून देवगडकडे प्रयाण व १० वाजता देवगड येथील मोरेश्वर जनार्दन गोगटे सांस्कृतिक भवन, जामसंडे येथे माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमास उपस्थिती. ११ वाजता देवगड येथून ओरोसकडे प्रयाण. दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आंगणेवाडी यात्रोत्सवाबाबत आढावा बैठक, १.३० वाजता जिल्हयातील सर्व शासकीय विभागांच्या प्रमुखांची बैठक, २.३० वाजता आंगणेवाडी येथे यात्रा कालावधीत मोबाईल टॉवर व वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बैठक, ३ वाजता जलजीवन मिशन व जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची आढावा बैठक, ३.३० वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग आढावा बैठक, ४ वाजता रेल्वे स्टेशन सुशोभिकरण प्रकल्प आढावा बैठक, ४.३० वाजता कुडाळ व्यापारी संकुलाबाबत बैठक, ५ वाजता कृषी विभाग, सिंधुदुर्ग अंतर्गत कामांची आढावा बैठक, सायंकाळी ५.३० वाजता वाळू धोरण व सिंधुदुर्ग जिल्हा महसूल यंत्रणेतील सर्व अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक, सायंकाळी ६ वाजता सिंधुदुर्ग जिल्हयातील पोलीस यंत्रणेतील सर्व अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक. रात्री ८ वाजता कुडाळ येथे भाजप पक्ष कार्यालयासमोर भाजप महिला मोर्चा, कुडाळ तालुका आयोजित मकर सक्रांत विशेष ‘तिळगुळ महोत्सव’ या कार्यक्रमास उपस्थिती. रात्री ८.३० वाजता कुडाळ येथून सावंतवाडीकडे प्रयाण. रात्री ९.३० वाजता सावंतवाडी येथे आगमन व राखीव.दि. १६ रोजी सकाळी ९ वाजता सावंतवाडी येथून सिंधुदुर्गनगरीकडे प्रयाण. सकाळी १०.३० वाजता पत्रकार भवन सभागृह ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्हा भाजप पदाधिकारी, मोर्चा अध्यक्ष, मंडल अध्यक्ष व अभियान संयोजक यांच्यासमवेत आढावा बैठक. ११.३० वाजता इच्छापूर्ती हॉल, ओरोस येथे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तर बक्षीस वितरण समारंभास उपस्थिती. दुपारी २.३० वाजता वेंगुर्त्याकडे प्रयाण. दुपारी ३.३० वाजता वेंगुर्ले येथे आगमन व Araqila रिसॉर्ट, सागरतीर्थ बीच, आरवली (वेंगुले) येथे “project Sindhuputra” या कार्यक्रमास उपस्थिती. ४.३० वाजता वेंगुर्ल येथून मोपा विमानतळ, गोवाकडे प्रयाण.

 

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!