कुडाळराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदार व मनमानी कारभाराला मनसेचा दणका..

▪️कुडाळ येथील कार्यालयात घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.२३: महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ शिष्टमंडळाने मंगळवार दिनांक २२ डिसेंबर रोजी कुडाळ येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची चक्क झाडाझडतीच घेतली. मनसे कार्यकर्ते अनपेक्षितपणे कार्यालयात आल्याने कर्मचाऱ्यांची धांदल पहावयास मिळाली. जबाबदार अधिकारी वा कर्मचारी नेहमीप्रमाणे कार्यालयात दैनंदिन हजेरी लावत नसल्याने मनसेचे पदाधिकारी संतापले. संबंधितांना दूरध्वनीवरून दहा मिनिटात हजर होण्याचा सूचना दिल्या. त्यानंतर श्री. बिराडे कार्यालयात हजर झाले. परंतु शाखा अभियंता श्री. पाटील यांनी साइटवर गेलो असल्याचा खोटा बनाव करून सावरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणत्या साइटवर उपस्थित आहात. त्याची माहिती द्या. आम्ही तिकडे येतो. असा मनसे पदाधिकाऱ्यांनी हट्ट धरल्याने मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी मोबाईल बंद करून वेळ मारून नेली.

यावर मनसे पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होऊन उपविभागीय अभियंता यांना मूव्हमेंट रजिस्टर वरील नोंदी दाखवण्याची मागणी केली असता त्यावर नोंदी नसल्याचे उघड झाले.

याबाबत कार्यकारी अभियंता श्री. माने यांच्याशी संपर्क करून कुडाळ येथील कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला असता त्यांनी रीतसर तक्रार द्या. कारवाई करतो. असा शब्द दिला.

याप्रसंगी तालुक्यातील  रस्त्यांवर चालू असलेल्या खड्डे भरणा कामांच्या कार्यपद्धतीवर मनसेने आक्षेप घेऊन सदोष पद्धती व निश्कृष्ट दर्जावर लक्ष वेधले. शिवाय कार्पेटचे काम करत असताना पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी गटार ड्रेनेज यंत्रणा सुस्थितीत करण्याच्या  सूचना दिल्या.

पावशी-घावनळे-आंबेरी, कुडाळ-चौके, मठ-कुडाळ, कुडाळ-पिंगुळी-पाट, झाराप-माणगाव या रस्त्यांची वार्षिक देखभाल दुरुस्तीची जबाबदारी घेतलेल्या कंत्राटदारांकडून तात्काळ डागडुजी करून घ्यावी, गटार ड्रेनेज यंत्रणा सुस्थितीत करावी, रस्त्यांवर वाढलेल्या झाडी झुडपांची साफसफाई करावी, खड्डे भरणा कामकाजासाठी केलेल्या खर्चाचा हिशोब जनतेसमोर ठेवा अशा मागण्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या.

मनसेच्या मागण्यांबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची हमी उपविभागीय अभियंता श्रीम.अनामिका जाधव यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून दिली.

यावेळी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे, कुडाळ शहर सचिव रमाकांत नाईक, विभाग अध्यक्ष सुंदर गावडे, विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष हितेंद्र काळसेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

*✝️आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगाव येथे प्रथमच नव्याने सुरू होत आहे.
*🏥जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगाव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी..!
*🛐अँक्यू नेचर क्युअर  पर्वरी-गोवा संचलित*

    *‼️निसर्गोपचार चिकित्सा केंद्र‼️*
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला..

*🌳निसर्ग हाच तुमचा डॉक्टर..!*
*🍓आहार हेच तुमचे औषध..!*

*🔵उपलब्ध सुविधा-*
⏺️योग-नॅचरोपॅथी
⏺️ॲक्युप्रेशर
⏺️आयुर्वेद
⏺️होमिओपॅथी
⏺️पंचगव्या
⏺️आहार सल्ला

*🟢निसर्गोपचार चिकित्सा उपचार-*
🔹सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
🔹मणक्यांचे विकार
🔹शारीरिक / मानसिक विकार
🔹श्वसनाच्या समस्या
🔹पोटांचे आजार
🔹मुत्राशयाचे विकार
🔹लकवा
🔹नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
🔹स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या

*🟣आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार💊💉
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣

*🟣उपचाराची वेळ🩺*
*सकाळी –*🌅 ८.०० ते दुपारी २.००,
*सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००
*🔋टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

*🔮संपर्क-*
*📱९४०३८२७२६१*
*📱८३२९३३१७२०*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!