कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

ट्रेकिंग रूट च्या माध्यमातून जिल्ह्यात पर्यटनाला वाव

 

ब्रिगेडियर सुधीर सावंत, माजी खासदार

प्रतिनिधी – सुनील आचरेकर

कुडाळ- सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. अनेक प्रकारच्या पर्यटनाला जिल्ह्यात वाव आहे. परंतु पर्यटकांना फारशा सोयी उपलब्ध नाहीत, पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याला विकास प्रगतीपथावर नेण्यास वाव आहे. अनेक प्रकारच्या पर्यटनामध्ये ट्रेकिंग हे पर्यटकांना आकर्षित करू शकते. हएक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. आपला जिल्हा दर्‍या-खोर्‍यानी, हिरव्यागालीच्याने नटलेला आहे. ट्रेकिंगद्वारे जिल्ह्यातील अनेक गावात पर्यटक जाऊ शकतात व जिल्ह्यातील निसर्गाचा व संस्कृतीचा आस्वाद घेऊ शकतात. स्थानिक विद्यार्थ्यांनी यात भाग घेणे, हा एक आकर्षक उपक्रम आहे, असे माजी खासदार ब्रिग्रेडियर सुधीर सावंत म्हणाले.

माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या प्रेरणेतून सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान, किर्लोस आणि ग्रामपंचायत कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने कसाल ते किर्लोस हा ट्रेकिंग रूट चालू करणार आहोत. जिल्ह्यात विविध ठिकाणी ट्रेकिंग रूट बनविले पाहिजेत हा उद्देश आहे. या ट्रेकिंग रूट मध्ये स्वत: खासदार ब्रिगेडियर . सुधीर सावंत सहभाग घेणार आहेत. कसाल मर्तलवाडी ते ओवळीये सडा ते ओवाळीये शिरवंडे सडा ते किर्लोस कृषि विज्ञान केंद्र पर्यंत हा रूट आहे. छत्रपती शिवाजी महाराज ट्रेकिंग ग्रुपचे ट्रेकिंग प्रेमी यात भाग घेणार आहेत. गुरुवार, दि. २४ डिसेंबर २०२० रोजी पावणाई रवळनाथ मंदिर, कसाल येथे सर्वांनी सकाळी ८.०० वाजता जमावयाचे आहे.

दूसरा रूट कसाल बालमवाडी ते पोखरण येथील कृषि विज्ञान केंद्राचे संशोधन केंद्र असा असणार आहे. निसर्गप्रेमी, ट्रेकिंग प्रेमी यांनी या ट्रेकिंग मध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान व ग्रामपंचायत कसाल यांच्या मार्फत करण्यात आले आहे. ट्रेकिंग प्रेमींनी येताना सोबत एक वेळचे स्वत:चे जेवण व पिण्याचे पाणी आणावयाचे आहे. अधिक महितीसाठी अॅड. विवेक राणे, मोबा. नं. ९४०४३४५४२४ व
डॉ. विलास सावंत मोबा. नं. ९४२२६३२९९१ यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान किर्लोस अँड विवेक राणे क्रीडा समन्वय यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!