भास्कर जाधवना त्यांची जागा दाखवू!
*🟥भास्कर जाधवना त्यांची जागा दाखवू!*
*🟥नीलेश राणे यांचा इशारा : गुहागरच्या सभेत प्रत्त्युत्तर देणार*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 ओरोस, दि.०६*:-यापुढे भास्कर जाधव यांनी नारायण राणे आणि कुटुंबाविरोधात एक जरी शब्द काढला, तर त्यांना त्यांची जागा दाखवू असा इशारा माजी खासदार नीलेश राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिला. जाहीर सभेत, एका कुटुंबाला शिव्या देण्याचं ते व्यासपीठ होतं का? असा सवालही राणे यांनी उपस्थित केला. माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सिंधुदुर्ग जिल्हयातील दौऱ्यादरम्यान कणकवली येथे जाहीर सभा झाली होती. यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्गसाठी काय केलं, याबद्दल बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र याबाबत न बोलता राणे कुटुंबाला शिव्या देण्यासाठी ही सभा घेतल्याचा आरोप राणे यांनी केला. दरम्यान, जाधव यांच्या राणे कुटुंबियांवरील वक्तव्याचा राणे यांनी खरपूस समाचार घेतला. यावेळी दादा साईल, पप्या तवटे, संजय वेंगुर्लेकर, आनंद शिरवलकर, संजू परब आदी उपस्थित होते.भास्कर जाधव हे वाळूचोर असल्याचा आरोप राणे यांनी केला. गुहागरातील त्यांची भाईगिरी नीलेशनेच संपवली आहे. १६ फेब्रुवारीला गुहागरला होणाऱ्या जाहीर सभेत चोख प्रत्युत्तर देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. राणे कुटुंबासाठी जी भाषा वापरली त्याच भाषेत उत्तर देऊ, असे ते म्हणाले.नारायण राणे यांच्याबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला काहीतरी सांगितलं होतं, असं भास्कर जाधव म्हणाले होते. मात्र, भास्कर जाधव बाळासाहेब ठाकरे यांच्याजवळ किती काळ होते, असा सवालही नीलेश राणे यांनी केला. ठाकरे कुटुंबावर बोललो असेन, तर राजकारणातून संन्यास घेईन, असे वक्तव्य भास्करजाधव यांनी केले होते. याबाबत बोलताना आदित्य ठाकरेंवर टीका करतानाचा एक व्हीडिओ त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर दाखवला. हा व्हीडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्हायरल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यानी वक्तव्य हे आदित्य ठाकरेंवर असल्याने भास्कर जाधव यांनी बोलल्याप्रमाणे राजकारणातून संन्यास घ्यावा, असे आव्हान त्यांनी दिले.स्टेजवर बोललात ते समोरासमोर येऊन बोलून दाखवा. सिंधुदुर्गातून परत मागे जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. भास्कर जाधव यांना आवरा. अन्यथा उद्धव ठाकरे आम्ही तुमच्यावर बोलू असा इशाराही नीलेश राणे यांनी दिला.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_