कसालात वाहतूक कोंडीने वाहन चालक त्रस्त
कसाल आठवडा बाजाराच्या दिवशी होते वाहतूक कोंडी
प्रतिनिधी – सुनील आचरेकर
कसाल:- येथील बसस्थानकासमोरील ब्रिज खाली गाड्या पार्किंग केल्या जातात त्या बाजारपेठे पासून लांब मोकळ्या जागेत पार्किंग कराव्यात,सिंडिकेट बँक समोर सर्व्हिस रोडवर गाड्या पार्किंग केल्या जातात त्या बाजारपेठेपासून लांब मोकळ्या जागेत पार्किंग कराव्यातएक दिशा मार्ग करावा,
आठवडा बाजाराच्या दिवशी दोन वाहतूक पोलीसांची नेमणूक करावी,कसाल सिंडिकेट बँक तिटा ते. शहरातील मुख्य बाजारपेठ रस्ता ते कसाल बसस्थानक गुरुवारी आठवडा बाजारादिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली.
दरम्यान वाहानधारकांस नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला स्थानिक ग्रामस्थांनी सिंडिकेट बँक जवळ वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सहकार्य केले कसाल शहर विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे गुरुवारी आठवडा बाजार या दिवशी तर कसाल सिंडिकेंट बँक समोरील रस्त्यावर पर्यटकांची एक कार पार्क करून ठेवून पर्यटक खरेदीसाठी बाजारात गेले याच ठिकाणी कसाल बस स्थानकातून
येणारे एसटी मालवण कडे जातात या सर्विस रस्त्याने विरुद्ध दिशेने सोडल्या जातात सिंडिकेट बँक समोर दोन्ही बाजूस टेम्पो, कार, मोटर सायकल ,चार चाकी वाहने, पार्किंग केले जातात आणि या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होते आठवडा बाजाराच्या दिवशी रस्ता दुतर्फा मोठ्या प्रमाणात फळ ,भाजी, कपडे विक्रेत्यांचे, अन्य साहित्य व विक्रेत्यांची आपापली दुकाने धाटली होती यातच काही ठिकाणी वाहने पार्क केली जातात त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली कसाल दशक्रोशीतील कसाल मुख्य बाजारपेठ आहे कसाल पोखरण ,आंब्रड ,कुसबे ,गावराई कुंदे , खोटले, वायंगवडे , पडवे, रानबांबुळी , हेदुळ ,आधी गावातील ग्रामस्थ येत असतात कसाल बसस्थानका समोरील ब्रिज खाली दोन्ही बाजूस मालाचे ट्रक, मोठा टेम्पो, चार चाकी वाहने ,मोटरसायकल या पार्किंग केल्या जातात त्यामुळे कणकवली कडून मालवण कडे जाणारे पर्यटक कणकवली कसाल कडे मालवण जाणाऱ्या एसटी बस आराम बस यांना मोठी कसरत करावी लागत आहे मुंबई-गोवा महामार्गावर कसाल सिंडिकेट बँक समोर सर्विस रोडच्या गटाराचे काम सुरू असून ते काम झाल्यानंतर या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला मातीचा ढिगारा ठेवल्याने एसटी बस चालकाला गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होते शिवाय कुडाळ कडून कणकवली कडे जाणाऱ्या सर्विस रोडवर वाहने पार्किंग केले जातात यामुळे सर्व्हिस रोडवर वाहतूक कोंडी होते शिवाय कसाल स्टॅन्ड वरून मालवण कडे जाणाऱ्या गाड्या याच सर्विस रोड वरून सोडल्या जातात यामुळे या सर्व्हिस रोडवर वाहतूक कोंडी होते या गाड्या बाजारपेठेतून सोडण्यात याव्यात एक दिशा मार्ग करावा अशी मागणी ग्रामस्थांनमधून व वाहनचालकांन मधून केली जात आहे तसेच बाजारपेठ व महत्त्वाच्या ठिकाणी दोन वाहतूक पोलिसांची आठवडा बाजरा दिवशी नेमणूक करावी अशी मागणी नागरिकांमधून तसेच वाहनचालकांकडून केली जात आहे.